25 April 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा
x

Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या

Equity Mutual Fund

Equity Mutual Fund | गुंतवणूक तज्ञ म्युचुअल फंडात पैसे लावताना नेहमी लवकर गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असून मागील काही वर्षांत लोकांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीला जास्त पसंती दिली आहे. म्युच्युअल फंडात दीर्घकालीन उद्दिष्टांसह गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो.

म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्य :
म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकर म्हणजे एकरकमी गुंतवणुक आणि दुसरा प्रकार म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जिला आपण SIP म्हणूनही ओळखतो. एसआयपीद्वारे तुम्ही म्युचुअल फंडमध्ये मासिक गुंतवणूक करू शकता. दीर्घकाळात जर तुम्हाला मोठा परतावा कमवायचा असेल तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तथापि, इक्विटी म्युच्युअल फंडमधील बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे यात शाश्वत परतावा मिळेल अशी अपेक्षा करू नका. तुमच्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक रक्कमेवर शेअर बाजारातील चढउतारांचा परिणाम होऊ शकतो.

या जोखीमपासून वाचण्यासाठी म्युच्युअल फंड युनिट्स कधी खरेदी करायचे, कधी विकायचे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इक्विटी मार्केटमध्ये केव्हा प्रवेश करायचा हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणे जितके सोपे आहे, तितके बाहेर पडणे सोपे नाही. त्यासाठी एक निश्चित प्रक्रियाचे पालन करावे लागते* सर्वप्रथम तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील स्टॉक्सचे एक्सपोजर विचारात घ्या. चांगला परतावा कमवण्यासाठी गुंतवणुकीचे व्यवस्थापन योग्यरीतीने करणे खूप गरजेचे आहे.

* इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक दीर्घ काळात चांगला परतावा कमावता येतो. शेअर बाजारात चढ-उतार आणि अस्थिरता येत जात असते. खरं तर, SIP गुंतवणूक केल्यास तुमच्या गुंतवणुकीवर या चढउतारांचा परिणाम होत नाही.
* जर म्युचुअल फंडाची कामगिरी खराब असेल तर त्यातून बाहेर पडणे अधिक चांगले. तथापि SIP मध्ये पैसे लावताना किमान दोन ते तीन वर्षांसाठी गुंतवणूक करावी. जर तुमचा म्युचुअल फंड मागील काही वर्षात आपल्या बेंचमार्क इंडेक्स आणि श्रेणीतील इतर फंड्सपेक्षा तुलनेत खराब कामगिरी करत असेल, तर त्यातून बाहेर पडणे अधिक चांगले.
* काही गुंतवणूकदार पैसे बुडण्याची जोखीम टाळण्यासाठी विविध पर्यायांमध्ये पैसे लावतात. अनेकजण सूचीतील टॉप ट्रेंडिंग पर्याय निवडतात. मात्र असे केल्याने त्यांचे पोर्टफोलिओमध्ये विविध पर्यायांची भेसळ होते आणि त्यामुळे परताव्याचा मागोवा घेणे कठीण जाते. जर समजा तुमच्याकडे 3-4 मोठे इक्विटी फंड असतील तर त्यातील 2-3 खराब प्रदर्शन करणाऱ्या फंडमधून बाहेर पडावे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Equity Mutual Fund Scheme for investment and long term benefits on 30 November 2022.

हॅशटॅग्स

equity mutual fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x