19 April 2024 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत

Money From IPO

Money From IPO | धर्मराज क्रॉप गार्ड या कृषी रसायन क्षेत्रातील कंपनीच्या आयपीओला मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. गुंतवणुकीसाठी शेअर खुला झाल्यावर दुसऱ्या दिवशी हा IPO 5.97 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. NSE निर्देशांकाच्या वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार या IPO मध्ये जारी करण्यात आलेल्या 80,12,990 शेअर्सच्या तुलनेत 4,78,68,720 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. Dharmeaj Crop कंपनी या IPO द्वारे 251.14 कोटी रुपये भांडवल जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. IPO मध्ये या स्टॉकची किंमत आकर्षक असल्याचे मत तज्ज्ञांनी आहे. त्याच वेळी या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्ण उत्पादनांचा ही समावेश होतो. कंपनी सुरुवातीपासून सतत नवीन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन यावर लक्ष केंद्रित करते. कंपनीच्या महसूल संकलन आणि नफ्यात जबरदस्त वाढ अपेक्षित आहे.

कोणत्या वर्गवारीत किती बोली प्राप्त झाली?
धर्मराज कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 7.75 पट अधिक सबस्क्राईब झालं आहे. त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 8.74 पट अधिक आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 76 टक्के अधिक सबस्क्राईब झालं आहे. IPO ऑफरच्या पहिल्या दिवशी धर्मराज क्रॉप्स कंपनीच्या IPO ला इतकी बोली प्राप्त झाली होती की, पहिल्या दिवशी IPO 1.79 पट सबस्क्राईब झाला होता. धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 74.95 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. या अँकर गुंतवणूकदारांमध्ये इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड, राजस्थान ग्लोबल सिक्युरिटीज आणि रेझोनन्स अपॉर्च्युनिटीज फंड यांसारखे मोठे गुंतवणुकदार सामील आहेत.

धर्मराज क्रॉप गार्ड GMP :
या कंपनीच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते आहे. कंपनीचा आयपीओ सुरुवातीच्या दिवसापासून ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. आज हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयेच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ शेअरच्या अप्पर प्राइस बँड नुसार, गुंतवणूकदारांना 23 टक्के अधिक लिस्टिंग प्रॉफिट मिळू शकतो.

IPO प्राइस बँड आणि लॉट साइज :
धर्मराज क्रॉप कंपनीच्या IPO साठी शेअरची किंमत 216-237 रुपये जाहीर करण्यात आली आहे. एक लॉटमध्ये 60 शेअर्स असतील. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 14 लॉटसाठी बोली लावू शकतात. 5 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप सुरू केले जाईल, अंक 8 डिसेंबर 2022 रोजी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होईल. या IPO अंतर्गत 216 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स खुल्या बाजारात गुंतवणुकीसाठी जारी केले जातील. त्याच वेळी कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांकडून OFS अंतर्गत 1,483,000 शेअर्स विकले जाणार आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :
धर्मराज क्रॉप कंपनीची स्थापना 2015 साली झाली होती. धर्मराज क्रॉप गार्ड लिमिटेड ही एक ऍग्रोकेमिकल क्षेत्रात उद्योग करते. ही कंपनी आपल्या B2C आणि B2B ग्राहकांसाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वाढ नियामक, सूक्ष्म खते आणि प्रतिजैविक यांसारख्या कृषी रासायनिक फॉर्म्युलेशनचे उत्पादन, वितरण आणि विपणन करण्याचे काम करते. शेतकऱ्यांना आपल्या शेत जमीनीची उत्पादकता आणि आपला नफा वाढवता यावा साठी ही कंपनी पीक संरक्षण उपाय देखील प्रदान करते. धर्मराज क्रॉप गार्ड लिमिटेड कंपनीचे उत्पादन लॅटिन अमेरिका, पूर्व आफ्रिकन देश, मध्य पूर्व आणि पूर्व आशियातील 20 पेक्षा अधिक देशांमध्येही आपले उत्पादन आणि वस्तू निर्यात करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Dharmraj Crop IPO is already opened for investment and Investors are investing to earn Money From IPO on 30 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x