23 April 2024 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

BREAKING | बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा, फडणवीसांची सखोल चौकशी करण्याचे ED ला विशेष पीएमएलए कोर्टाचे आदेश

DCM Devendra Fadnavis

DCM Devendra Fadnavis | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा, अशी मागणी अॅड. रवी जाधव यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात रीतसर अर्ज दाखल केला होता. मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात चौकशीच्या मागणीसाठी अर्ज केला होता. विशेष पीमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी जाधव यांचा हा अर्ज स्वीकारला होता.

दरम्यान, राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. साल 2008 दरम्यान चर्चेत आलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणात फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात वकील रवी जाधव यांनी तसा रितसर अर्ज दाखल केला होता. रवी जाधव हे जमीन मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या वकील सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रवीण उके यांचे वकील आहेत. याच प्रकरणातील सुनावणी दरम्यान जाधव यांनी मंगळवारी हा अर्ज कोर्टात सादर होता.

त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दणका दिला. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील फडणवीस यांच्या सहभागाबाबत अॅड. सतीश उके यांनी केलेल्या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेत न्यायालयाने या प्रकरणात ईडीला सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. उके यांनी त्यांच्या अर्जामध्ये फडणवीस यांच्याबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे फडणवीस मोठ्या संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे. दैनिक सामनाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
15 वर्षांपूर्वी अॅड. उके यांनी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला. त्यातील राजकीय लागेबांधे उघडकीस आणले. त्यावेळी घोटाळ्यातील मास्टरमाइंड धरमदास रामाणी यांना वाचवण्याचा खटाटोप देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला असं आरोप आहे. याच दरम्यान उके यांच्याविरोधात धरमदास रामाणी यांनी खंडणीची तक्रार दाखल केली. नंतर त्या तक्रारीत तथ्य नसल्याचे तपासात सिद्ध झाले आणि पोलिसांनी ‘बी समरी’ अहवाल दाखल केला. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी 15 वर्षांपूर्वीच्या खंडणीच्या तक्रारीचा फेरतपास करीत उके यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यावेळी उके यांनी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळासंबंधित आपल्या तक्रारीचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित घोटाळा दडपण्याचेच प्रयत्न सुरू झाले. ते प्रकरण मागे टाकून ईडीने अलीकडेच रामाणी व देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील कारनाम्यासंबंधीत कागदपत्रे आपल्या घरातून जप्त केली.

या सर्व कारनाम्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करीत उके यांनी मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाची विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी गंभीर दखल घेतली आणि बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातीचा कथित मास्टरमाइंड धरमदास रामाणी, देवेंद्र फडणवीस व नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सखोल चौकशी करण्याबाबत ईडीच्या दिल्लीतील संबंधित विभागाला आदेश दिला. यावेळी न्यायालयात ईडीचे सहाय्यक संचालक एस. परमेश्वरन हे उपस्थित होते. उके यांच्या अर्जाची मूळ प्रत तपास यंत्रणेकडे प्राप्त झाली, यासंदर्भात परमेश्वरन यांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर स्वाक्षरीही केली. अर्जदार उके सध्या आर्थिक अफरातफर प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात पैद आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis to investigate by Nagpur stamp scam case PMLA court order check details on 30 November 2022.

हॅशटॅग्स

#DCM Devendra Fadnavis(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x