26 April 2024 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

VIDEO | महागाई - बेरोजगारीमुळे लोकं त्रस्त, बाळासाहेबांचा पक्ष फोडून आता त्यांच्या नावाचा गुजरात निवडणुकीत भाजपकडून वापर

Balasaheb Thackeray

Balasaheb Thackeray | गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर ट्विट केला आहे, ज्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मोदींबद्दल त्यावेळच्या परिस्थितीवर एक विधान केलं होतं. या ट्विटमध्ये रवींद्र जडेजाने लिहिले की, अजून वेळ आहे, गुजराती लोकांना समजते. प्रसिद्ध क्रिकेटपटू जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिवाबा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

वास्तविक, गुजरातमध्ये बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे झाल्याने भाजपाची प्रचंड अडचण झाली आहे. परिणामी, मोदी ते शहांपर्यंत सर्वच नेत्यांच्या सभांमध्ये खाली खुर्च्यांचे खच पाहायला मिळत आहेत. भाजपचा काळातच महागाई आणि बेरोजगारी अधिक वाढल्याने आम्ही त्रस्त आहोत असं लोकं प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यावर येऊन सांगत आहेत. तसेच मोदींच्या कोणत्याही भावनिक मुद्द्यांना मतदार प्रतिसाद देत नसल्याने भाजपाची अडचण वाढली आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर सर्वाधिक फॉलोअर असल्याने आणि पत्नी भाजपाची उमेदवार असल्याने त्याला हेतु पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंचा हा व्हिडिओ शेअर करण्यात सांगितल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातली आणि त्याच पक्षाला फोडून त्यांचं चिन्ह देखील गोठवलं त्याच बाळासाहेबांचा आज भाजप गुजरातमध्ये वापर करतंय हे स्पष्ट दिसतंय.

2017 मध्ये धर्मेंद्रसिंह जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून विजयी झाले होते, पण यावेळी तिकीट कापून जाडेजाच्या पत्नीला संधी देण्यात आली आहे. समीकरणांनुसार, या जागेवर भाजप बऱ्यापैकी ताकदवान आहे, पण रिवाबा यांचे सासरे आणि वहिनी यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला आहे. त्यांची वहिनी नयनाबा जाडेजा काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीआधी रिवाबा यांनी कुटुंबात कोणताही फरक नसून हा केवळ विचारधारेचा विषय असल्याचं स्पष्ट केलं. माझा जनतेवर विश्वास आहे, असं रिवाबा यांनी म्हटलं आहे. “जामनगरने आम्हाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. जडेजाचा जन्म इथेच झाला, त्याने आपल्या करिअरची सुरुवातही इथेच केली, लोकांकडून त्याला खूप अपेक्षा आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Indian cricketer Ravindra Jadeja shared Balasaheb Thackeray video on voting day in Gujarat check details on 01 December 2022.

हॅशटॅग्स

#Balasaheb Thackeray(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x