19 April 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

IIFL Mutual Fund | IIFL म्युच्युअल फंडाने नवीन फंड लाँच केला, 21 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीची संधी, स्कीमचे फायदे वाचा

IIFL Mutual Fund

IIFL Mutual Fund | IIFL म्युच्युअल फंड कंपनीला भारतातील पहिला टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड म्हणजे IIFL ELSS निफ्टी-50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड सुरू करण्याचा मान जातो. या नवीन फंडमध्ये 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे. ही म्युचुअल फंड योजना एक ओपन-एंडेड पॅसिव्ह इक्विटी लिंक्ड बचत योजना आहे. गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक केल्यास कर लाभांसह प्रचंड मोठा परतावा कमावण्याची संधी मिळेल. या न्यू फंड ऑफर मध्ये गुंतवणूक करण्याची मुदत 1 डिसेंबर 2022 ते 21 डिसेंबर 2022 पर्यंत असेल. इतर सक्रिय म्युचुअल फंड योजनेच्या तुलनेत हा न्यू फंड ऑफरचे खर्चाचे प्रमाण खूप कमी आहे. IIFL ELSS निफ्टी-50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड ही स्कीम 2 जानेवारी 2023 पासून गुंतवणूक आणि पूर्ततेसाठी पुन्हा खुली केली जाईल. पारिजात गर्ग यांना IIFL ELSS निफ्टी-50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंडाचे समर्पित निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कलम 80C अंतर्गत कर सवलत :
IIFL ELSS निफ्टी-50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड ही योजना गुंतवणुकदारांना आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर बचतीचे दुहेरी लाभ प्रदान करते. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केटमधील वैविध्यपूर्ण एक्सपोजरमधून नफा कमावण्याची खूप मोठी संधी मिळेल. हा एक टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड असल्याने भारतीय लार्ज कॅप कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी-50 इंडेक्स फॉलो करणारा पोर्टफोलिओ तयार करेल. हा एक स्थिर निष्क्रिय प्रकारचा फंड असून तो सक्रियपणे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या योजनांच्या तुलनेत अधिक फायदेशीर असेल. IIFL च्या या एनएफओबद्दल तज्ञ म्हणतात की, “भारतीय शेअर मार्केटमध्ये एकूण भाग भांडवलात निफ्टी 50 चा वाटा 50 टक्के आहे. निष्क्रिय म्युचुअल फंडांद्वारे निफ्टी-50 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून इक्विटीच्या वाढीतून फायदा कमावण्याची, कर खर्च कमी करण्याची, गुंतवणुकीचा खर्च कमी करण्याची, आणि पोर्टफोलओ मध्ये विविधता आणण्याची सुवर्ण संधी मिळेल”.

NFO गुंतवणुकीचे उद्दिष्ट :
ज्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत प्रचंड मोठा फंड तयार करायचा असेल त्यांनी या म्युचुअल फंडमध्ये बिनधास्त गुंतवणूक करावी. निफ्टी-50 इंडेक्समध्ये समावेश असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करून निफ्टी-50 इंडेक्सच्या एकूण परताव्या इतकाच नफा मिळवण्यासाठी निर्देशांकाच्या समान प्रमाणात गुंतवणूक करणे हे या टॅक्स सेवर म्युचुअल फंड योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतही प्रदान करते. या म्युचुअल फंड योजनेचे आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल याची कोणतीही शाश्वती नाही. या योजनेतील गुंतवणूक वाटपाच्या तारखेपासून पुढील 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या अधीन राहील, म्हणजे तुम्ही ही गुंतवणुक 3 वर्षाच्या आधी कधी शकणार नाही. बाजारात गुंतवणूक करणारे लोक खूप दिवसांपासून अशा न्यू फंड ऑफरची वाट पाहत होते, जे त्यांना टॅक्स सेविंग बेनिफिट देतील. भारतीय इक्विटी मार्केटने नेहमी देशांतर्गत तसेच जागतिक अस्थिर परिस्थितीं विरुद्ध जबरदस्त लवचिकतेचे प्रदर्शन केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IIFL Mutual Fund has Launched New Fund Offer for investors for Tax saving benifits on 2 December 2022.

हॅशटॅग्स

IIFL Mutual Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x