20 April 2024 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Loan Settlement | लोन सेटलमेंट करताय? आधी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, अन्यथा भविष्यातील अर्थकारण चुकेल

Loan Settlement

Loan Settlement | आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून आपण वैयक्तिक कर्जाचा आधार घेतो. परंतु कर्ज घेतना आपल्यावर ते परत फेड करण्याची जबाबदारी देखील असते. कर्ज घेतल्यावर आपल्या उत्पन्नाचा एक भाग कर्जाची परतफेड करण्यात जातो. कर्जाची परतफेड करत असल्यामुळे आपण काहीच रक्कम बचत करु शकत नाही. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की, कर्जाचा कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही पूर्ण कर्ज एकरकमी पूर्ण फेडू शकतात. व्यापारी लोकामध्ये एक वाक्यप्रचार खूप प्रचलित आहे की, ” शक्य तितक्या कमी कर्ज घ्या, आणि शक्य तितक्या लवकर फेडा.” वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत या तत्त्वाचे पालन केल्यास तुमचा खूप फायदा होऊ शकतो.

मुदत संपण्यापूर्वी कर्जाची परतफेड :
जर शक्य असेल तर कर्जाची वेळेपूर्वी परतफेड केल्यास तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. जेव्हा तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम जमा असेल आणि तुम्हाला त्या पैशाचा वापर योग्य ठिकाणी वापरायचे असतील, ते हे पैसे वापरून तुमच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करु शकता. जर तुम्ही कर्जाचे पूर्ण प्रीपेमेंट केले तर तुम्ही व्याजापोटी भरावी लागणारी खूप मोठी रक्कम तुम्ही वाचवू शकता. तुम्ही कर्जाची मुदत संपेपर्यंत पैसे भरत राहिल्यास, तुम्हाला प्रत्येक हप्त्यामध्ये व्याजाचे ही पैसे द्यावे लागतील, परंतु जर तुम्ही एकाच वेळी सर्व कर्जाची परतफेड केली तर, तुम्हाला सर्व व्याज भरावा लागणार नाही. आणि त्या संपूर्ण व्याजाची रक्कम तुमच्याकडे बचत होईल. साधारणपणे सर्व प्रकारच्या वैयक्तिक कर्जासाठी एक निश्चित लॉक-इन कालावधी दिलेला असतो, या लॉक इन कालावधीनंतर तुम्ही कर्जाची थकबाकी रक्कम एका वेळी फेडू शकतात. जरुरी नाही की, तुम्ही सुरुवातीच्या काही वर्षांतच प्रीपेमेंट करावी तर फायदा होईल, तुम्ही काही वर्षानंतर कर्जाचा कालावधी पूर्ण होण्याआधी परतफेड करू शकता.

प्रीपेमेंटवरील दंड आकारणी :
कर्जाची प्रीपेमेंट करताना तुम्हाला काही प्रमाणात दंड भरावा लागेल, यालाच फोरक्लोजर असे देखील म्हणतात. तुमचे कर्ज वेळेपूर्वी फिटत असल्यामुळे बँकेला व्याजाचा तोटा सहन करावा लागतो, त्यामुळे बँका अशा परिस्थितीत तुमच्यावर मुदतपूर्व कर्ज फेडताना दंड आकारतात. तथापि, आरबीआयच्या नियमांनुसार, फ्लोटिंग रेटच्या आधारावर देण्यात आलेल्या कर्जावर कोणताही दंड शुल्क भरावा लागत नाही, मात्र वैयक्तिक कर्ज एका निश्चित दरावर दिले जाते म्हणून तुम्हाला तर परतफेड करता दंड भरावा लागेल. या दंडाचा दर 3 ते 5 टक्के दरम्यान असू शकतो. ज्या पैशाने तुम्ही कर्जाचे प्रीपेमेंट करणार आहात, ती रक्कम तुम्हाला इतर ठिकाणी गुंतवून चांगला परतावा मिळत नसेल तर या रकमचे वापर करून तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड केली पाहिजे.

व्याजाची रक्कम अर्धवट पेमेंटद्वारे :
समजा एकाच वेळी तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही कर्जाची परतफेड अर्धवट पेमेंटमध्ये ही करू शकता. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे संपूर्ण कर्जाच्या परतफेडीसाठी रक्कम नाही, परंतु एक मोठी रक्कम तुमच्या हातात आहे, तर तुम्ही ती रक्कम आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरू शकता. पूर्ण कर्ज एकच वेळी फेडावे असे कोणतेही बंधन नाही. यामुळे तुमची मूळ रक्कम, EMI आणि एकूण व्याज कमी होईल. लक्षात ठेवा की जर तुम्ही कर्जाचा मोठा भाग परतफेड केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम :
कर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर तात्काळ कोणताही परिणाम होणार नाही. कर्जाची परतफेड वेळेवर आणि नियमित केल्यास दीर्घ काळात तुमचा क्रेडिट स्कोअर वाढू शकतो. अर्धवट कर्जाची परतफेड केल्यास क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम होणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Loan Settlement process and effects on credit score of prepayment of Loan before time on 03 December 2022.

हॅशटॅग्स

#Loan Settlement(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x