25 April 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त विधान

BJP leader Chandrakant Patil

BJP Leader Chandrakant Patil | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनीही महापुरुषांवर बोलतांना केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आत्ताचे शाळा सुरू करतांना सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहतात, मात्र पूर्वी महापुरुषांनी शाळा सुरू केल्या त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे विधान केले आहे.

शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून येत्या काळात यावरून आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नंतर वक्तव्यांबद्दलची भूमिका मांडली
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत आपल्या वक्तव्यांबद्दलची भूमिका मांडली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी काय म्हटलं हे मी सांगण्यापेक्षा लाईव्ह सगळ्यांनी पाहीलं असेल, की ज्यामध्ये. शाळा कोणी सुरू केल्या? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीरभाऊराव पाटील, महात्मा फुलेंनी सुरू केल्या आणि मग त्या शाळा सुरू करताना, ते शासकीय अनुदानावर अवलंबुन राहिले नाहीत, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. भीक म्हणजे काय आताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी, देणग्या म्हणूयात. पण आपण साधरणपणे असं म्हणतो की, दारोदार भीक मागितली आणि मी माझी संस्था वाढवली.”

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP leader Chandrakant Patil made controversial statement check details on 09 December 2022.

हॅशटॅग्स

#BJP leader Chandrakant Patil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x