25 April 2024 7:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, मनसेकडून पत्रकं प्रसिद्ध

MNS Party, Loksabha 2019, Raj Thackeray

मुंबई : अनेक दिवसांपासून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चेला उधाण आलं होतं. नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांसह सामान्यांचे देखील लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ ही मनसे लढवणार नाही असं पत्रकं मनसेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र मनसेची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. मनसे निवडणूक लढणार की नाही याबाबत कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेर या प्रश्नाला मनसेकडूनच उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकृतरित्या पत्रक काढत आगामी लोकसभा निवडणूक मनसे लढणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे १९ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीबाबत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला. मनसेला आघाडीत घेतल्यावर त्याचा फटका उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो अशी शक्यता काँग्रेसकडून वर्तवली जात होती. त्यामुळे महाआघाडीत देखील मनसेला स्थान राहिलं नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x