29 March 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

भाजपने नाही, शिवसेनेने एनसीपीच्या शरद पवारांना प्रवेश दिला होता, ते पुन्हा नगरसेवकही झाले नाहीत

Shivsena, Udhav Thackeray

मुंबई : अमरावती येथील युतीच्या मेळाव्यात भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्ष होत असल्याचा धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकत, निदान आता शरद पवार यांनाच भाजपमध्ये प्रवेश देऊन नका टोला लगावला होता.

दरम्यान, शरद पवार यांचे नाव घेत त्यांनी हा खोचक टोला लगावला असला तरी, २०१६ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान नगरसेवक फोडाफोडीच्या खेळात राष्ट्रवादीचे मुंबई चांदिवली येथील माजी नगरसेवक शरद पवार यांचा भव्य प्रवेश करून घेतला होता. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या चांदिवली येथील कार्यालयाच्या उदघाटनाला शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी देखील हजेरी लावली होती. परंतु पुढे झालेल्या मनपा निवडणुकीत त्यांचा मनसेच्या उमेदवाराने पराभव केला होता आणि ते पुन्हा माजी नगरसेवकच राहिले.

सध्या त्या वॉर्डमध्ये मनसेची ताकद असल्याने शिवसेनेने पुन्हा पैशाचा खेळ करत मनसेचे ६ नगरसेवक फोडले आणि त्यात शिवसेनेचे शरद पवार यांचा पराभव करणारे अशोक पाटेकर यांचा देखील समावेश होता. दरम्यान, सध्या येथे मनसेचे विभागअध्यक्ष भिंताडे यांचा चांगला दबदबा आहे. त्यामुळे आजही या वॉर्डमध्ये मनसेलाच चांगले भविष्य आहे. त्यात सध्या या वॉर्डमधली शिवसेनेच तत्कालीन पराभूत उमेदवार शरद पवार यांची अवस्था ना घरका ना घटका अशी झाल्याने येथे भविष्यात मोठी अंतगत पक्ष फूट होऊन सेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शिवसेनेत गेलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शरद पवार यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने उद्धव ठाकरे यांचे अमरावतीतील युतीच्या मेळाव्यातील तो टोमणा किती हास्यास्पद होता त्याचा प्रत्यय येतो.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x