25 April 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Multibagger IPO | होय! या IPO ने 1 दिवसात पैसे दुप्पट करताच टॉप बॉलीवूड कलाकारांकडून शेअर खरेदीचा सपाटा, डिटेल्स..

Multibagger IPO

Multibagger IPO | काल शेअर बाजारात DroneAcharya Innovations कंपनीच्या IPO ची शानदार लिस्टिंग झाली. शेअर बाजारात जबरदस्त पडझड असताना या कंपनीच्या शेअरची शानदार लिस्टिंग पाहायला मिळाली आहे. या स्टॉक बाबत गमतीची गोष्ट अशी की, ज्यां लोकांनी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्याचे पैसे लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत. BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झालेल्या या ड्रोन स्टार्ट अप कंपनीने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी या ड्रोन स्टार्टअप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पहिल्याच दिवशी 100 टक्के वाढले. यासोबतच बॉलिवूड स्टार आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी ही या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांचाही पैसा IPO लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी दुप्पट झाला आहे.

शेअर होल्डिंग प्रमाण :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी ड्रोन कंपनीचे 4.57 लाख शेअर्स खरेदी केली होते. ब्लॉकबस्टर IPO लिस्टिंगनंतर त्यांच्या 2.45 कोटी रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.89 कोटी रुपये झाले आहे. काल या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर 107.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र लिस्टिंगमध्ये शेअरची किंमत 98.33 टक्के अधिक वाढली होती.

2022 या वर्षाच्या सुरुवातीला प्री आयपीओ भांडवल उभारणीच्या फेरीदरम्यान बॉलिवूड स्टार आमिर खान याने ड्रोन आचार्य कंपनीचे 46,600 शेअर्स 25 लाख रुपयांना खरेदी केले होते. आणि रणबीर कपूरने ही या कंपनीचे 37,200 शेअर्स 20 लाख रुपये मध्ये खरेदी केले होते. IPO पूर्वी गुंतवणुकदारांना 53.59 रुपये प्रति शेअर या किमतीवर शेअर विकण्यात आले होते. IPO लिस्टिंग च्या पहिल्याच दिवशी आज या दोन्ही कलाकारांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.

गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद :
पुणे येथे स्थित असलेल्या या ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी शानदार प्रतिसाद दिला होता. या कंपनीचा आयपीओ ओव्हर सबस्क्राइब झाला होता. अवघ्या तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 262 पट अधिक सबस्क्राईब झाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 330 पेक्षा जास्त सबस्क्राईब झाला होता.

कंपनीचा व्यवसाय थदोक्यात :
DroneAcharya Al ही कंपनी Directorate General of Civil Aviation द्वारे रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन प्रमाणित परवाना मिळवणारी भारतातील पहिली कंपनी आहे. मार्च 2022 पासून आतापर्यंत या कंपनीने 200 पेक्षा जास्त ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहेत. अर्थातच या कंपनीचा IPO मल्टीबॅगर सिद्ध झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DroneAcharya Innovations companies IPO has got listed on stock market with a premium price on 24 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x