28 March 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

Pramod sawant, Chief Minister of Goa

पणजी : मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत झालेली राजकीय खलबतं, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत गोव्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच कांग्रेसने केलेला सत्तास्थापनेचा दावा आणि भाजपाचे सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगोच्या नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्याने सत्तास्थापनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, महाराष्ट्र गोमंतक आणि गोवा फॉरवर्डच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची अट मान्य झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x