20 April 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 160 जागा असुरक्षित, फडणवीसांचा सेना फोडण्याचा सल्ला मोदी-शहांना देशभर भोवणार - रिपोर्ट

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 | राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांतील बदल आणि बिहार तसेच महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला आगामी लोकसभेच्या ‘असुरक्षित’ जागांची यादी पक्षाच्या अंतर्गत मूल्यमापनात १४४ वरून १६० पर्यंत वाढविणे भाग पडले असून, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जागांवरून मोदी शहांची चिंता प्रचंड वाढल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

आगामी लोकसभेच्या ‘असुरक्षित’ जागांच्या यादीचा आढावा घेण्यासाठी संसदेच्या अधिवेशन काळात भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या यादीमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांचे मूल्यमापन करण्यात आले आणि कोणत्या चुका त्याला कारणीभूत ठरल्या यावर सखोल चर्चा पार पडली. मोदी सरकारमधील मंत्र्यांना संघटनात्मक कार्य करण्यासाठी आणि केडरमध्ये जमिनी स्थरांवरील कामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बिहारमध्ये राजकीय विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अंगलट आल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. कारण जनता दल (यू), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे पक्ष यांसह सात सदस्यीय महाआघाडी या भाजपविरोधात उभे राहिल्यामुळेआगामी लोकसभा २०२४ मध्ये या अनेक जागा जिंकण्यात अडचणी येतील, असं स्पष्ट म्हटलं गेलंय. ही संख्या आधीच्या यादीतील चारवरून अद्ययावत यादीत १०-१२ जागांवर करण्यात आली आहे. बिहारमधील असुरक्षित जागांच्या यादीत नवादा, वैशाली, वाल्मिकी नगर, किशनगंज, कटिहार, सुपौल, मुंगेर, झंझारपूर, गया आणि पूर्णिया या जागा आहेत. तसेच येथे भाजप येथे ७० ते ८० टक्के लोकसभा जागा गमावून बसणार असे संकेत देण्यात आले आहेत. परिणामी मोदी-शहांची चिंता वाढली आहे.

महाराष्ट्रात मोठा फटका बसणार :
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती तुटल्याने आणि शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट यांच्यात झालेली फाटाफूट यामुळे बरीच कटुता निर्माण झाली असून, भाजप विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे तसेच फडणवीसांचा शिवसेना फोडण्याचा सल्ला मोदी-शहांच्या २०२४ मधील मनसुब्यांवर पाणी फिरवणारा एक घटक ठरू शकतो असं देखील या बैठकीत म्हटलं गेलंय.

फडणवीसांचा सेना फोडण्याचा सल्ला भाजपाला देशभर भोवणार
भाजपच्या दिल्लीतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई दक्षिण मध्यसारख्या जागांवर, जी जुन्या महायुती व्यवस्थेअंतर्गत शिवसेनेकडे होती आणि राहुल शेवाळे हे खासदार आहेत, ती जागा पडल्यात जमा आहे असं भाजपने म्हटलं आहे. शिंदे गटातील अनेक खासदारांविरोधात भाजपचे दिल्लीतील प्रमुख एक व्यूहरचना आखात आणि त्याच कारण म्हणजे त्यातील अनेक खासदार पराभूत होणार असल्याचं या बैठकीत म्हटलं गेलंय. त्यामुळे उद्या जरी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास तयार झाले तरी मतदारांमध्ये असलेली प्रचंड नाराजी दूर करण्यासाठी गुजरात प्रमाणे आयत्यावेळी येथे वेगळ्याच उमेदवाराला तिकीट दिलं जाईल जेणे करून मतदारांचा रोष कमी करण्यात येईल असं या दिल्लीतील नेत्याने म्हटले. शिंदे हे काही महाराष्ट्रात राजकीय ब्रँड किंवा चेहरा असं अजिबात नसल्याची खात्री दिल्लीतील भाजपाला पटली आहे. तसेच फडणवीसांनी मोदी-शहांना शिवसेना फोडण्याचा दिलेला सल्ला आज भाजपाला देशभर भोवल्याचं या बैठकीत म्हटलं गेलं असं या नेत्याने सांगितलं. कारण शिवसेनेसारखा मोठा पक्ष फोडून त्यांचं अस्तित्व संपविण्याचा केल्या गेलेल्या प्रयत्नाने देशभरातील स्थनिक पक्ष सतर्क झाले आणि भाजपसोबत न जाणं हेच महत्वाचं समजू लागले आहेत. परिणामी एनडीए हा देशपातळीवर केवळ एक शब्द बनून राहिला आहे असं देखील या नेत्याने म्हटले आहे. फडणवीसांच्या सल्ल्यावर दिल्लीतील वरिष्ठांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपविण्याचा केलेला प्रयत्न देशातील मोठ्या प्रमाणातील हिंदूंना सुद्धा न पटल्याने तोही फटका बसणार असं भाजपाला वाटू लागलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टातील निर्णय जर शिंदेच्या विरोधात गेल्यास अनेकांचं राजकीय आयुष्य धुळीस मिळेल, त्याला देखील फडणवीसांचाच चुकीचा सल्ला कारणीभूत असेल असं या दिल्लीतील भाजप नेत्याने स्पष्ट केले आहे. परिणामी भाजपच्या लोकसभेच्या अनेक जागा देखील धोक्यात येतील असं सांगताना ती संख्या एकाआकडी सुद्धा असेल असा रिपोर्ट आल्याचं म्हटलं गेलंय.

पाटणा येथे आयोजित आढावा बैठक
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यांतील लोकसभेच्या १०० ‘असुरक्षित’ जागांचा सामना करणाऱ्या विस्तारक किंवा पूर्णवेळ पक्षाच्या कार्यकर्त्यांशी दोन दिवसांच्या कार्यशाळेसाठी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची २१ डिसेंबर रोजी पाटणा येथे बैठक झाली. या बैठकीला आढावा व प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्यांमध्ये सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष, संयुक्त सरचिटणीस (संघटन) शिवप्रकाश, सरचिटणीस सुनील बन्सल, बिहारचे प्रभारी विनोद तावडे आणि सहप्रभारी हरीश द्विवेदी यांचा समावेश होता.

आज हैदराबाद येथे अशीच बैठक
उर्वरित ६० जागांसाठी २८ डिसेंबर रोजी आज हैदराबाद येथे अशीच बैठक होणार आहे. “असुरक्षित” जागा म्हणून वर्गीकृत केलेल्यांमध्ये, पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 24 जागा आहेत, त्यानंतर महाराष्ट्र 11, बिहार 10, उत्तर प्रदेश 10, आसाम पाच, तेलंगणा पाच आणि पंजाबमध्ये तीन जागा आहेत. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये त्रिपुरा आणि दमण आणि दीवप्रमाणे प्रत्येकी एक आहे.

त्यानंतर या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी ४०-४५ जागांच्या समूहातील या जागांवरील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. २०२४ जवळ येत असताना राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता असल्याने असुरक्षित जागांच्या या यादीत आणखी जागांचाही समावेश होऊ शकेल, अशी आमची अपेक्षा आहे,’ असे भाजपमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election 2024 BJP Internal report check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x