25 April 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पहिली यादी जाहीर; मोदींच्या राजकीय गुरूंचा पत्ता कट? अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी

BJP, MP Kirit Somaiya, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातू भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक लालकृष्ण अडवाणी यांना पक्षाकडून डावललं जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपाच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याचबरोबर, या यादीत महाराष्ट्रातील एकूण १६ उमेदवारांची नावे आहे. यात अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेवारी देण्यात आली आहे. तर, लातूरमधून सुधाकर राव शिंगारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव शिंगारे
सांगली – संजयकाका पाटील

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x