24 April 2024 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Income Tax Slab Change | खुशखबर! 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर फक्त एवढाच टॅक्स कापला जाणार, टॅक्स स्लॅब बदलला

Income Tax Slab Change

Income Tax Slab Change | देशाचा अर्थसंकल्प २०२३ यायला थोडाच अवधी शिल्लक आहे. केंद्र सरकार यावेळी अर्थसंकल्पात मोठे बदल करण्याचा विचार करत आहे. अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पात नवा टॅक्स स्लॅब जोडू शकतात, त्यामुळे 5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांना कमी टॅक्स भरावा लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी मध्यमवर्गीयांना मोठी भेट देण्याच्या विचारात आहेत.

टॅक्स स्लॅबमध्ये होणार बदल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्यांना मोठी सूट मिळू शकते. म्हणजेच 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना पूर्वीपेक्षा कमी कर भरावा लागणार आहे.

१० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के टॅक्स आकारला जाईल
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्नात 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत मोठा बदल होऊ शकतो, अशी माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. या उत्पन्न गटासाठी सरकार 10 टक्क्यांचा नवा स्लॅब जोडण्याचा विचार करत आहे. सध्या त्यावर 20 टक्के कर आकारला जातो. यंदाच्या अर्थसंकल्पात या टॅक्स स्लॅबसाठी कपात जाहीर केली जाऊ शकते.

पगाराच्या ब्रॅकेटनुसार बदल होतील
यासोबतच १० ते १५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींवरील करही २५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर यावरील उत्पन्नाच्या ब्रॅकेटवर करात कोणताही बदल करण्याचा विचार नाही.

सध्या काय आहे व्यवस्था
सध्या सिस्टममध्ये 5 टॅक्स स्लॅब आहेत. अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. अडीच ते पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाच टक्के, पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के, १० लाख ते २० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ३० टक्के आणि २० लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जातो. सध्या सरकार या स्लॅबमध्ये आणखी एक नवा स्लॅब जोडू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Income Tax Slab Change for income up to 10 lakhs check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

#Income Tax Slab Change(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x