19 April 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | काय चाललंय काय? 1 महिन्यात 450% परतावा दिला या शेअरने, आजही 5% वाढला

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स एक महिन्याभरापूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात बंपर परतावा कमावून दिला आहे. कंपनीचे नाव जेवढे मोठे आहे, परतावा देखील तेवढाच मोठा आहे. कंपनीने स्टॉक लिस्टिंग झाल्यावर अवघ्या एका महिन्याभरातच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. हा मल्टीबॅगर IPO स्टॉक मागील महिन्यात 30 रुपये या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 20 डिसेंबर 2022 रोजी BSE-SME इंडेक्सवर शेअर 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. IPO ची लिस्टिंग शेअर बाजारात झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्स लोकांना 450 टक्के परतावा मिळवून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 173.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

शेअरची लिस्टिंग 100 टक्के प्रीमियमवर :
‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ या फॅशन ज्वेलरी कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये आपला IPO 30 रुपये प्रति शेअर किमतीने लाँच केला होता. या कंपनीचा आयपी 8 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि IPO ची मुदत 13 डिसेंबर 2022 रोजी पूर्ण झाली होती. या कालावधीत कंपनीचा IPO 230.84 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर तिचा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 248.68 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या SME कंपनीचा IPO 20 डिसेंबर 2022 रोजी 57 रुपये किमतीवर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या स्टॉकने लोकांना 100 टक्के लिस्टिंग प्रॉफिट झाला आणि शेअरची किंमत 59.85 रुपयेवर पोहोचली होती.

गुंतवणुकीवर परतावा :
मल्टीबॅगर कंपनीच्या स्टॉकने या 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट गाठला होता. जर तुम्ही या कंपनीचे शेअर लिस्ट झाल्यानंतरही खरेदी केले असते तर तुम्हाला आतापर्यंत तिप्पट परतावा मिळाला आता. या कंपनीचा शेअर 57 रुपयांवर लिस्ट झाला होता, आणि 13 जानेवारी 2023 रोजी शेअरची किंमत 164.85 रुपयांवर पोहोचली होती. म्हणजेच एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 189 टक्के परतावा कमावला आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 4000 शेअर्स जारी केले होते. आणि एक लोत खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराला 1.20 लाख जमा करावे लागले होते. मात्र आज लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.56 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PNGS Gargi Fashion Jewellery Share Price 543709 in focus check details on 16 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x