25 April 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

Deep Diamond India Share Price | 1 वर्षात 842% परतावा देणाऱ्या कंपनीने जाहीर केले स्टॉक स्प्लिट, स्टॉक स्प्लिटचा फायदा घेणार?

Deep Diamond india Share price

Deep Diamond India Share Price | ‘दीप डायमंड इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स या आठवड्यात एक्स स्प्लिटवर ट्रेड करणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली होती. या कंपनीने आपल्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपयांवरून 1 रुपये प्रति शेअर करण्यासाठी स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 20 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. दीप डायमंड कंपनीचे शेअर्स आज 5 अप्पर सर्किटवर 152.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निर्देशांकावर शेअर जवळपास 5 कमजोरीसह 152.55 रुपयांवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी दीप डायमंड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 152.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)

एका वर्षात दिला 842 टक्के परतावा :
‘दीप डायमंड इंडिया’ कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 842 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकची किंमत जवळपास 339 टक्के वाढली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर मध्ये पैसे लावणाऱ्या लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,000 टक्के वाढले आहे.

‘दीप डायमंड इंडिया’ या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 171.95 रुपये होती. तर या शेअरची नीचांक किंमत पातळी 11 रुपये होती. दीप डायमंड इंडिया कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने या तिमाहीत 61 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुप्पट नफा झाला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने 32 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीने आपला खर्च कपात केल्यामुळे नफा वाढला आहे.

स्टॉक स्प्लिटबद्दल सविस्तर :
स्टॉक मार्केटमध्ये शेअरची तरलता वाढवण्यासाठी कंपन्या आपले स्टॉक स्प्लिट करतात. रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स असतात त्यांच्या शेअरचे विभाजन केले जाते. आणि स्टॉक स्प्लिट रेशोनुसार शेअरची किंमत समायोजित केली जाते. स्टॉक स्प्लिटचा आणखी एक फायदा म्हणजे किरकोळ गुंतवणुकदारांना शेअर्स स्वस्तात उपलब्ध होतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Deep Diamond India Share Price 539559 in focus check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#Deep Diamond India Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x