29 March 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईंचाच सल्ला घेणार, शिवसेनेच्या मुंबई पालिकेचा घाट

BMC, Shivsena

मुंबई : सीएसटीएम स्थानकाजवळील हिमालय पुलाचा भाग कोसळण्यास जबाबदार ठरलेल्या बेजबाबदार कंत्राटदारावर पालिका प्रशासनाने १६ पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी टाकली आहे. हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाई असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्तीसाठी पालिका तेरा कोटी ८६ लाख मोजणार आहे. पालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या जीव धोक्यात येणार आहे.

१४ मार्च रोजी हिमालय पुलाचा भाग कोसळून एकूण ६ निर्दोष मुंबईकरांचा मृत्यू तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. हिमालय पूल कोसळून झालेली दुर्घटना बनावट स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिकेने कंत्राटदारावर कारवाई केली. भक्कम पुराव्याच्या आधारे कंपनीचा ऑडिटर निरजकुमार देसाई याला दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली. चुकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळे हिमालय पूल दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत व पॅनलवरून हकालपट्टीही करण्यात आली. असे असताना पालिकेने एबीसीडी आणि ई विभागातील पुलांची व भुयारी मार्गाची किरकोळ दुरुस्तीसाठी डी. डी. देसाईचा सल्ला घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा या वर्दळीच्या भागातील १६ पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी ८६ लाख, ४० हजार ८९ रुपये खर्च केला जाणार आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर देसाईने केलेल्या इतर पुलांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे असताना मुंबईतील पुलांच्या व भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठीचा सल्ला पुन्हा डी. डी. देसाईचा घेतला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x