20 April 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

South Indian Bank Share Price | या बँकेचा शेअर सध्या 16 रुपयांना, 130% परतावा दिला, अर्थसंकल्पापूर्वी खरेदी करा, टार्गेट प्राईस पहा

South Indian Bank Share Price

South Indian Bank Share Price | जर तुम्हाला बजेट सादर होण्यापूर्वी चांगले स्टॉक खरेदी करायचे असतील तर ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअर वर लक्ष ठेवा. हा स्टॉक तुम्हाला चांगला फायदा कमावून देऊ शकतो. एकेकाळी हा बँकिंग स्टॉक 1.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर सध्या त्याची किंमत 18 रुपयेच्या वर गेली आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदीवर सर्व गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजार तज्ञांच्या मते साऊथ इंडियन बँकेच्या शेअर धारकांना अल्पावधीत 39 टक्के नफा मिळू शकतो. मागील सहा महिन्यांत या बँकेच्या शेअरची किंमत 130 टक्क्यांनी वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, South Indian Bank Share Price | South Indian Bank Stock Price | BSE 532218 | NSE SOUTHBANK)

साउथ इंडियन बँकेच्या शेअरचा इतिहास :
मागील सहा महिन्यांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअरची किंमत 17 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 5 दिवसांपासून शेअरची किंमत कमजोर झाली आहे आणि या कालावधीत गुंतवणुकदारांना 5 टक्के नुकसान सहन करावे लागले आहे. 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 6 टक्क्यांनी पडली आहे. 1 जानेवारी 1999 पासून आतापर्यंत या बँकिंग स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1340 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी हा शेअर फक्त 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या बँकिंग स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 21.80 रुपये होती तर नीचांक किंमत पातळी 7.25 रुपये होती.

टार्गेट प्राईस :
जेएम फायनान्शिअल फर्मच्या तज्ञांनी साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स 25 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकची बजेट पिक स्टॉक म्हणून निवड केली आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 8.54 टक्के घसरणीसह 16.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते स्टॉकमध्ये अल्पावधीत 39 टक्के वाढ होऊ शकते. मागील एका वर्षात या बँकेने जबरदस्त कामगिरी केली होती. तांत्रिकदृष्ट्या स्टॉकमध्ये सध्या पुलबॅक पाहायला मिळत आहे, हीच खरेदीची योग्य संधी आहे असे तज्ञ म्हणतात. तज्ञांनी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 15 रुपये स्टॉप लॉस लावून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 2-3 आठवड्यांत या स्टॉकमध्ये जबरदस्त ट्रेक्शन पाहायला मिळू शकते. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | South Indian Bank Share Price 532218 SOUTHBANK stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

South Indian Bank Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x