23 April 2024 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

OnePlus 11R 5G | वनप्लस 11R 5G स्मार्टफोन होणार स्वस्त, वनप्लस 11 5G पेक्षा कमी किंमत

OnePlus 11R 5G

OnePlus 11R 5G | चीनची टेक कंपनी वनप्लस आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस ११ पुढील महिन्यात ७ फेब्रुवारीला लाँच करणार आहे. आता या दिवशी लाँचिंग इव्हेंटमध्ये वनप्लस 11 आर 5G देखील लाँच होणार असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच भारतीय ग्राहकांना पुढील महिन्यात दोन नवीन वनप्लस खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. वनप्लस 11 5G आणि वनप्लस 11 आर 5G व्यतिरिक्त वनप्लस बड्स प्रो 2 टीडब्ल्यूएस इयरफोन्स आणि नवीन वनप्लस टीव्ही मॉडेल देखील 7 फेब्रुवारीरोजी वनप्लस क्लाउड इव्हेंटमध्ये लाँच केले जाऊ शकते. कंपनीने वनप्लस 11 5G चीनमध्ये लाँच केले आहे, परंतु वनप्लस 11 आर 5G चे स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आलेले नाहीत.

वनप्लस 11R 5G कीमत
वनप्लस 11 5G भारतीय बाजारात वनप्लसचा फ्लॅगशिप डिव्हाइस म्हणून लाँच केला जाणार आहे, त्यामुळे दुसरा डिव्हाइस फीचर्सच्या बाबतीत कमी पॉवरफुल असेल. जर असे असेल तर वनप्लस 11 आर 5G ची किंमत देखील फ्लॅगशिप मॉडेलपेक्षा कमी असेल. म्हणजेच दमदार कॅमेरा आणि परफॉर्मन्ससाठी युजर्सला फ्लॅगशिप डिव्हाइसपेक्षा कमी किंमतीत दुसरा पर्याय मिळणार आहे.

वनप्लस 11R 5G या किंमतीत येऊ शकतो
वनप्लस 11 आर 5G च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज च्या बेस व्हेरियंटची किंमत 35,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. तर हाय-एंड 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असलेल्या डिव्हाइसचे व्हेरिएंट 45,000 रुपयांच्या जवळपास किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. वनप्लस एस २ या नावाने हा फोन चीनमध्ये लाँच होण्याची चिन्हे आहेत.

OnePlus 11R 5G स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 11 आर 5G मध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह 16 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळू शकते. अँड्रॉइड १३ वर आधारित ऑक्सिजनओएस सॉफ्टवेअरही यात उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅमेरा फीचर्स
कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ट्रिपल कॅमेरा सिस्टीममध्ये फोनच्या रियर पॅनेलवर ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर असेल. कॅमेरा मॉड्यूलमध्ये 8 एमपी अल्ट्रा-वाइड आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स देखील मिळतील. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी नवीन डिव्हाइसमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. डिव्हाइसच्या 5000 एमएएच बॅटरीवर 100 वॉटपर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: OnePlus 11R 5G price in India check details on 25 January 2023.

हॅशटॅग्स

#OnePlus 11R 5G(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x