24 April 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर बँक FD पेक्षा 8 पटीने परतावा देतोय, आता स्टॉक वर नवीन टार्गेट प्राईस

Canara Bank Share Price

Canara Bank Share Price | कॅनरा बँकेने नुकताच आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेच्या निव्वळ नफ्यात 92 टक्क्यांची अप्रतिम वाढ पहायला मिळाली आहे. तज्ज्ञांनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कॅनरा बँकेचे शेअर पुढील काळात 410 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर 3.51 टक्के घसरणीसह 308.90 रुपयांवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK)

भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणुकदारांना कॅनरा बँकेचे शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 410 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात हा स्टॉक 28 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. 12 पैकी 10 तज्ञांनी या स्टॉप बाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. सहा तज्ञांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

कॅनरा बँक शेअरची वाटचाल :
जर तुम्ही कॅनरा बँकेच्या शेअरच्या चार्ट पॅटर्न चे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की, या PSU बँकेच्या शेअरमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी आणि नीचांक किंमत पत्की दरम्यान निम्म्या फरक आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 341.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 171.75 रुपये होती. सध्या हा स्टॉक 314 ते 320 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 2023 या नवीन वर्षात कॅनरा बँकेची कामगिरी थोडी निराशाजनक राहिली आहे. या कालावधीत कॅनरा बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.38 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

कॅनरा बँकेच्या नफ्यात वाढ होण्याचे कारण :
या PSU बँकेच्या नफ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे, कॅनरा बँकेने आपल्या बुडीत कर्जात मोठ्या प्रमाणात घट केली असून व्याज उत्पन्नात वाढ केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये कॅनरा बँकेने 23 टक्के अधिक फायदा कमावला आहे. तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या भांडवली पर्याप्ततेचे प्रमाणही सुधारले आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत कॅनरा बँकेच्या निव्वळ नफ्यात 92% ची वाढ झाली असून बँकेने एकूण 2,882 कोटी रुपये नफा कमावला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाही काळात कॅनरा बँकेने 21,312 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Canara Bank Share Price 532483 CANBK stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

#Canara Bank Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x