20 April 2024 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Comfort Intech Share Price | 31 रुपयाच्या शेअरने 1300% परतावा दिला, स्टॉक स्प्लिटचा फायदा, हा स्टॉक स्वस्तात खरेदी करणार?

Comfort Intech Share Price

Comfort Intech Share Price | नुकताच ‘कम्फर्ट इंनटेक’ कंपनीने आपले शेअर विभाजित करण्याची घोषणा केली होती. या स्मॉल स्टॉक कंपनीचे शेअर विभाजित होणार असल्याची बातमी समोर येताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली आहे. कम्फर्ट इनटेक कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 18 टक्क्यांच्या वाढीसह 33.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 33.80 रुपये ही किंमत या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत आहे. कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 19.80 रुपये होती. ही कंपनी मुख्यतः ब्रुअरीज आणि डिस्टिलरीजच्या उद्योगात काम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Comfort Intech Share Price | Comfort Intech Stock Price | BSE 531216)

स्टॉक स्प्लिटबाबत निर्णय :
‘कम्फर्ट इंनटेक’ कंपनी स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ,”10 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये संचालक मंडळातील सदस्यांद्वारे डिसेंबर 2022 मधील आर्थिक तिमाही निकालावर चर्चा केली जाईल. याशिवाय याशिवाय संचालक मंडळाच्यामारी सदस्यांद्वारे कंपनीच्या शेअरचे विभाजन करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. या कंपनीचे बाजार भांडवल 103 कोटी रुपये आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये 1300 टक्क्यांची वाढ :
कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 3 वर्षांत 1300 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. 3 एप्रिल 2020 रोजी BSE निर्देशांकावर या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 2.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 25 जानेवारी ,2020 रोजी या कंपनीचे शेअर 33.80 किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही या कंपनीच्या मागील सहा महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, तुम्हाला समजेल की या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या सहा महिन्यात 26 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2022 या तिमाही काळात कम्फर्ट इनटेक कंपनीने 40.01 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर ,2022 या तिमाहीमध्ये कंपनीने 1.89 कोटी रुपये कमाई केली होती. जून 2022 या तिमाहीमध्ये कंपनीने 44.10 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Comfort Intech Share Price 531216 stock market on 26 January 2023.

हॅशटॅग्स

Comfert Intech share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x