19 April 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Servotech Power Systems Share Price | जबरदस्त शेअर, 273% परतावा प्लस भरघोस डिव्हीडंड कमाई, स्टॉक डिटेल्स पहा

Servotech Power Systems Share Price

Servotech Power Systems Share Price | ‘सर्वोटेक पॉवर सिस्टम्स’ या इलेक्ट्रिक उपकरण निर्मिती क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 0.20 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोबत कंपनी 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट देखील करणार आहे. याचा अर्थ, कंपनीचे शेअर्स पाच तुकड्यांमध्ये विभाजित केले जातील. कंपनीने आपल्या शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपयेवरून कमी करून दोन रुपयेवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 3 फेब्रुवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Servotech Power Systems Share Price | Servotech Power Systems Stock Price | NSE SERVOTECH)

कंपनीची योजना :
‘सर्वोटेक पॉवर सिस्टम्स’ कंपनी संपूर्ण भारतात चॅनेल वितरण नेटवर्कचा विस्तार करत आहे. या कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 1500 हून अधिक EV चार्जर स्टेशन सुरू केले आहेत. सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही आपला व्यापार विस्तार केला आहे. कंपनीने एक कंपोनंट निर्माण केला आहे जो, एक सोलर परफॉर्मन्स मॉनिटरिंग डिव्हाइस आहे. या कंपनीने लिथियम आयन आणि ट्यूबलर बॅटरी निर्माण करणारी कंपनी टेकबॅक ला आपल्या कार्यात सामील करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सोबत लाभांश आणि स्टॉक स्प्लिट यासह अनेक कॉर्पोरेट क्रियांची घोषणा केली आहे. कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे मजबूत निकाल देखील जाहीर केले आहे.

कंपनीचे तिमाही निकाल :
चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ‘सर्वोटेक पॉवर सिस्टम्स’ कंपनीने एकत्रित आधारावर 83.27 कोटी रुपयेचे निव्वळ सेल्स केले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 41.41 कोटी रुपये निव्वळ सेल्स केला होता, जो या तिमाहीत 101 टक्के वाढला आहे. FY23 मधील तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 3.87 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला जो माहीत वर्षी याच तिमाहीत 1.07 कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या नफ्यात एका वर्षात 261 टक्के वाढ झाली आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचा EPS 0.58 रुपयांवरून वाढून डिसेंबर 2022 तिमाहीत 1.82 रुपयेवर पोहोचला आहे.

6 महिन्यांत शेअरमध्ये 273 टक्के वाढ :
‘सर्वोटेक पॉवर सिस्टम्स’ या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन तसेच किरकोळ गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 घसरणीसह 220.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 40 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 273 टक्के परतावा मिळवून दिला आहे. इतकेच नाही तर या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या शेअर धारकांना 77.9 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने नुकताच लाभांश आणि स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे स्टॉक पुन्हा एकदा तेजीत आला आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे वाढले :
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स’ या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे पैसे 15 महिन्यांत 9 पट अधिक वाढले आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 19.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 245.60 रुपये किमतीपर्यंत पोहचला आहे. मागील 15 महिन्यांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांकच्या पैशाचे मूल्य 11.5 पट वाढले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.5 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Servotech Power Systems Share Price SERVOTECH stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

Servotech Power Systems Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x