20 April 2024 2:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल

Sunteck Realty Share Price

Sunteck Realty Share Price | रियल्टी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘सनटेक रियल्टी’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 0.23 टक्के घसरणीसह 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज सुरुवातीच्या काही तासात निफ्टी आणि सेन्सेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर दोन्ही निर्देशांकामध्ये कमालीची रिकवरी पाहायला मिळाली. ‘सनटेक रियल्टी’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत उत्कृष्ट निकाला जाहीर केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 59000 रुपये लावले होते, ते लोक आज लखपती झाले आहे. जबरदस्त तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या स्टॉकमध्ये 70 टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्मने सनटेक रियल्टी कंपनीच्या शेअरची नवीन टार्गेट प्राईस 590 रुपये निश्चित केली आहे. आज हा स्टॉक 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sunteck Realty Share Price Share Price | Sunteck Realty Stock Price | BSE 512179 | NSE SUNTECK)

59 हजारांवर एक कोटी परतावा :
4 एप्रिल 2006 रोजी ‘सनटेक रियल्टी’ कंपनीचे शेअर्स 2.06 रुपयांवर ट्रेड करत होते. आता शेअरची किंमत 16893 टक्क्यांच्या वाढीसह 347.65 रुपये किमतीवर आली आहे. 2006 मध्ये ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 59,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 170 पट वाढून 1 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. मागील वर्षी 4 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 543.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 314.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांक किंमत पातळीवर आली होती. आतापर्यंत सनटेक रियल्टी शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळाली आहे. मात्र स्टॉक अजूनही आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 36 टक्के खाली आहेत.

तिमाही निकाल :
‘सनटेक रियल्टी’ कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केले आहे. या कंपनीने वार्षिक 400 कोटी रुपयेची सेल्स केली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1800 कोटी रुपये सेल्स बुकिंगचे लक्ष्य निर्धारित केले होते. एप्रिल ते डिसेंबर 2022 या 9 महिन्यांत कंपनीने 1070 कोटी रुपये सेल्स बुक केला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीने 2500 कोटी रुपये सेल्स बुकिंगचे लक्ष्य निर्धारित केले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने ‘सनटेक रियल्टी’ कंपनीचे शेअर्स 590 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणुक करण्यात काही जोखीम आहेत, कारण मुंबईतील मालमत्ता बाजारात मंदी असून निवासी घराच्या किमती घसरल्या आहेत. याचा नकारात्मक परिणाम शेअर्सवर होऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sunteck Realty Share Price 512179 SUNTECK stock market live on 3 February 2023.

हॅशटॅग्स

Sunteck Realty Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x