25 April 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

पालकांसाठी बुरे दिन! यावर्षी स्कूल बसचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार

Shivsena, BJP

मुंबई : स्कूल बस मालक संघटनेने वाढलेल्या महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेने जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, डिझेलसह बसचा विमा, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचा देखभाल खर्च वाढला आहे असं स्पष्ट केलं. याशिवाय मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बस मालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या नावाखाली आणलेल्या नव्या नियमावलीमुळेही बस मालकांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, २०१९-२० या येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी दहा ते पंधरा टक्के दरवाढ केली जाईल.

दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे स्कूल बस मालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यंदा पावसाळ्यात ज्या मार्गावर खड्डे असतील, त्याठिकाणी स्कूल बस सेवा बंद केली जाईल, असे अनिल गर्ग यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. खड्ड्यांबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही मार्ग निघत नसल्याने यापुढे पालकांनीच महापालिकेसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

मुंबईत तेरा आसनी क्षमतेहून कमी आसन क्षमतेच्या वाहनांना स्कूल बसचा परवाना देऊ नये, असे कोर्टाचे आदेश आहेत. तरीही आरटीओकडून परवाना देण्यात येत असून वाहतूक पोलीसही अशा बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे तेरा आसन क्षमतेहून कमी आसन क्षमतेच्या वाहनांमधून शाळकरी मुलांची वाहतूक दिसल्यास संबंधिच विभागातील वाहतूक पोलीस आणि आरटीओंविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणार असल्याचे संघटनेने सांगितले.

हॅशटॅग्स

#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x