16 April 2024 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं? IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल
x

Ksolves India Share Price | या आयटी कंपनीने जाहीर केला बक्कळ लाभांश, गुंतवणुकदारांना मिळणार मजबूत फायदा, रेकॉर्ड डेट पहा

Ksolves India Share Price

Ksolves India Share Price | सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या बऱ्याच कंपन्या आपल्या शेअर धारकांना लाभांश वितरण करत आहेत. बहुतांश कंपन्यांनी डिसेंबर 2022 तिमाहीच्या निकालांसह लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. IT कंपनी ‘कॅसोल्वस इंडिया’ आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे. भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी ‘कॅसोल्वस इंडिया’ ने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Ksolves India Share Price | Ksolves India Stock Price | BSE 543599 | NSE KSOLVES)

कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रती शेअर 3 रुपये लाभांश वाटप करणार आहे. या लाभांश वाटपासाठी ‘कॅसोल्वस इंडिया’ कंपनीने 4 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचे नाव 4 मार्च 2023 रोजी पर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील असेल, त्यांना कंपनी लाभांश वाटप करेल.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘कॅसोल्वस इंडिया’ कंपनीचे शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 429 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.07 टक्के वाढीसह 431.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या IT कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 495 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 356 रुपये होती.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘कॅसोल्वस इंडिया’ ही एक कर्जमुक्त कंपनी असून कंपनीचा PE 23.4 आहे. सेक्टरल PE 50.2 असून त्या तुलनेत कंपनीचा PE गुणोत्तर कमी आहे. कंपनीचा ROE प्रमाण 106.12 टक्के आहे. या बाबतीत ‘कॅसोल्वस इंडिया’ ही कंपनी टाटा अॅलेक्सीसारख्या दिग्गज कंपन्यांच्या पुढे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ksolves India Share Price 543599 KSOLVES stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

Ksolves India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x