29 March 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअरची अजूनही घसरण थांबेना, गुंतवणुकदरांची चिंता वाढली, स्टॉक आणखी किती पडणार?

TTML share Price

TTML Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार वैतागले आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना कंगाल केले आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 56.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. काल या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती तर आज स्टॉक तेजीत धावत होता. काल टीटीएमएल कंपनीचे शेअर 8.34 टक्के घसरणीसह 52.75 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. टीटीएमएल स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 82 टक्के कमजोर झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

टीटीएमल शेअरची कामगिरी :
टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 82 टक्के खाली ट्रेड करत आहेत. BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील.काही महिन्यांपासून मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेला टीटीएमएल स्टॉक 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसात 17 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका महिन्यात टीटीएमएल स्टॉक 30.13 टक्के पडला आहे.

टीटीएमल शेअर्स प्राइस हिस्ट्री :
टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने YTD आधारे 38.83 टक्के नकारात्मक वाढ नोंदवली आहे. तथापि मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 50.64 टक्के कमजोर झाले आहेत. या दरम्यान शेअरची किंमत 117.60 रुपयांवरून घसरुन 52.75 रुपयांवर आली आहे. टीटीएमएल कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस आणि डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या मोठया दिग्गज कंपन्या सामील आहेत. टीटीएमल ही कंपनी लार्ज कॅप गटात मोडतो. आणि टीटीएमएल कंपनीचे बाजार भांडवल 10,468.64 कोटी रुपये आहे. जर तुम्ही जानेवारी 2023 मध्ये टीटीएमएल कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 19 हजार रुपये झाले असते. टीटीएमएल ही Tata Teleservices ची उपकंपनी असून ती आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये मार्केट लीडर मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x