19 April 2024 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Astral Share Price | एस्ट्रल शेअर्स निम्म्या किमतीवर आले, हा स्टॉक खरेदी करावा का? डिटेल्स पहा

Astral Share Price

Astral Share Price | ‘एस्ट्रल लिमिटेड’ या लार्ज कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे बाजार भांडे 38,373.85 कोटी रुपये आहे. या कंपनीने शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी या आठवड्यात शेअर बाजारात एक्स बोनस म्हणून ट्रेड करेल. CVVC पाईप्स मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीने 1267.80 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर यापूर्वी दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 1102.70 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तथापि, कंपनीच्या EBITDA घसरत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा EBITDA 184.40 कोटी रुपये होता. मागील वर्षी डिसेंबर 2021 मध्ये याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 203.80 कोटी रुपये पर्यंत वाढला होता.

परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 55.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर परकीय संस्थागत गुंतवणूकदार म्हणजेच FII नी 14.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. देशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 15.23 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. कंपनीमध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 14.04 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याआधी सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीमध्ये एफआयआयची हिस्सेदारी 14.88 टक्के होती. मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के घसरणीसह 1,404.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात ‘एस्ट्रल लिमिटेड’ या पाईप मेकर कंपनीचा स्टॉक केवळ 26.49 टक्के कमजोर झाला आहे. त्याचवेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 41.77 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Astral Share Price return on investment check details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

Astral Pipes Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x