20 April 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये न थांबणारी घसरण सुरू, स्टॉकमध्ये पुढे काय होणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. येस बँकेचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपला आणि शेअर मध्ये घसरण सुरू झाली. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी येस बँक शेअर 1.29 टक्के घसरणीसह 15.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. येस बँकेचे शेअर्स सध्या आपल्या सहा महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांकावरून शेअर सुमारे 37 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. (Yes Bank Limited)

स्टॉक घसरणीचे कारण :
येस बँकेच्या मोठ्या गुंतवणूकदार बँकानी प्रॉफिट बुकींगला सुरुवात केली आहे. येस बँकेतील शेअरचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया सारखे दिग्गज गुंतवणुकदार बँकेचे शेअर्स विकून प्रॉफिट बुक करत आहेत. यामुळे स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील आठ दिग्गज बँकांनी येस बँकेमध्ये 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

ब्रोकरेज फर्मचे मत :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने म्हंटले आहे की, “येस बँकेचे शेअर्स 14 रुपयांच्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हल जवळ ट्रेड करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, जर हा स्टॉक 14 रुपये खाली आला, तर आणखी खोलात जाऊ शकतो म्हणून या टप्प्यावर स्टॉक खरेदी करण्याची अजिबात घाई करु नये. मोतीलाल ओसवाल फर्म चे तज्ञ म्हणाले, “सध्या येस बँक शेअर कमजोर असल्याने त्याला खरेदी करणे टाळले पाहिजे”.

17 ऑगस्ट 2018 रोजी येस बँकेचे शेअर्स 393 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र आर्थिक संकटात सापडल्यानंतर येस बँकेचे शेअर्स 96 टक्के कमजोर झाले आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 8.90 टक्के कमजोर झाला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत येस बँकेने 52 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. तथापि वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 80 टक्के घसरण झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये येस बँकेने 266 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 1970.6 कोटी रुपये होते. त्याच वेळी वित्तीय वर्ष 2020 च्या मार्च तिमाहीत येस बँकेने 106 कोटी रुपये नफा कमावला होता, जो डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये 9 पटीने वाढला असून 914 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price 532648 return on investment check details on 15 March 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x