19 April 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मोठे फेरबदल, शेअर्सवर काय परिणाम होणार? जाणून घ्या पूर्ण घडामोड

TCS Share Price

TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच ‘टीसीएस’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. ‘टीसीएस’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि MD ‘राजेश गोपीनाथन’ यांनी 6 वर्षे कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पदत्याग केला आहे. ‘राजेश गोपीनाथन’ यांच्या कार्यकाळात टीसीएस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला होता. या दरम्यान ‘टीसीएस’ कंपनीचे शेअर्स 164 टक्क्यांनी वाढले होते. तर कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 352.50 रुपये लाभांश देखील वाटप केला होता. गोपीनाथन यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये कंपनीने 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर 2018, 2020 आणि 2022 मध्ये अनुक्रमे 16, 16 आणि 18 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक देखील केले होते. या काळात टीसीएस कंपनीच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली होती. कोविड आणि आर्थिक मंदीच्या काळात ‘टीसीएस’ कंपनीचा मार्जिन सुधारला होता, सध्या हा दर 13 टक्क्यांवर आला आहे. (Tata Consultancy Services Limited)

‘टीसीएस’ स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
‘नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ फर्म तज्ञ म्हणाले की, टीसीएस कंपनीच्या व्यवस्थापन मंडळतील बदल नक्कीच सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. तथापि गुंतवणूकदारांनी याकडे केवळ कंपनीची एक प्रक्रिया म्हणून पहावे. नुवामा फर्मचे तज्ञ म्हणाले की, टीसीएस कंपनीच्या शेअरच्या किमतीत होणारी कोणतीही घसरण ही खरेदीची एक सुवर्ण संधी आहे. या घसरणीमुळे ‘टीसीएस’ स्टॉक सध्या आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल फर्मने ‘टीसीएस’ कंपनीच्या स्टॉकची लक्ष किंमत 4100 रुपये जाहीर केली आहे. यासोबतच अनेक तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के घसरणीसह 3,111.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गोपीनाथन यांच्या राजीनामा दिल्यानंतर ‘टीसीएस’ कंपनीने तात्काळ सीईओ म्हणून बँक, वित्तीय सेवा, विमा युनिटचे जागतिक प्रमुख ‘के क्रितिवासन’ यांना नियुक्ती केले आहे. गोपीनाथन यांनी 21 फेब्रुवारी 2017 रोजी ‘टीसीएस’ कंपनीच्या MD आणि CEO पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र राजीनामा दिल्यानंतरही ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्या पदावर काम करत राहणार आहेत. गोपीनाथन आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच टाटा उद्योग समूहासोबत काम करत आहेत. 1996 मध्ये त्यांनी टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपमधून कामाला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्यांनी ‘टीसीएस’ कंपनी जॉईन केली. गोपीनाथन यांनी कंपनीमध्ये सीएफओसह विविध पदावर काम केले आहे. गोपीनाथन यांनी चंद्रशेखरन यांच्याकडून टीसीएस कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price 532540 check details on 20 March 2023.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x