20 April 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Reliance Industries Share Price | भरवशाचा 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चा शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?

Reliance Industries Share Price

Reliance Industries Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. या घसरणी दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांच्या कंपनी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर 1.50 टक्के घसरणीसह 2,183 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. कंपनीचे बाजार भांडवल आता 14,81,100.75 कोटी रुपयांवर आले आहे. 28 एप्रिल 2022 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 2856 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 23 टक्क्यांनी घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. (Reliance Industries Limited)

रिलायन्स कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी 3.12 टक्के वाढीसह 2,270.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही आठवड्यापासून रिलायन्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त अस्थिरतेला तोंड देत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 6.74 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.69 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे? :
आयडीबीआय कॅपिटल फर्मचे तज्ञ म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या नीचांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. या कडे गुंतवणूकदारांनी खरेदीची सुवर्ण संधी म्हणून पहावे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही स्टॉक खरेदीची उत्तम संधी असू शकते. Tips2trades फर्म चे तज्ञ म्हणतात की, रिलायन्स कंपनीचे शेअर्स सध्या मंदीच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. या स्टॉकला 2304 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने रिलायन्स कंपनीवर स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 3,000 रुपये किंमत पार करू शकतात असे तज्ञ म्हणतात.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समधील घसरणीच्या दरम्यान, कंपनीने अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या डील पूर्ण केल्या आहेत. कंपनीने आपल्या रिटेल उपक्रम अंतर्गत ‘कॅम्पा कोला’ हा ब्रँड परत लाँच केला आहे. त्याच वेळी भारतीय स्पर्धा आयोगाने जर्मन रिटेल कंपनी ‘मेट्रो एजी’ च्या भारतातील होलसेल ऑपरेशनचे अधिग्रहण करण्याची मान्यता रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला दिली आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया 2850 कोटी रुपयांमध्ये खरेदी करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Industries Share Price 500325 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Industries Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x