29 March 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Hemang Resources Share Price | कमाईची संधी! 164 टक्के परतावा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक डिटेल्स पहा

Hemang Resources Share Price

Hemang Resources Share Price | काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. आज बाजार काही प्रमाणात तेजीत ट्रेड करत होता. कधी-कधी शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळतो, तर कधी बाजार मजबूत तेजीत व्यवहार करत असतो. अशा गोंधळाच्या काळात काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करतोय तिचे नाव आहे, ‘हेमांग रिसोर्सेस लिमिटेड’. मागील तीन-चार दिवसापासून हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटला धडक देत आहेत. (Hemang Resources Limited)

एकीकडे शेअर बाजार कमालीच्या गोंधळात ट्रेड करत आहे, तर दुसरीकडे ‘हेमांग रिसोर्सेस’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स काल अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनाक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 49.62 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 16 आणि 17 मार्च 2023 रोजी देखील या कंपनीच्या शेअर्सनी अप्पर सर्किट हीट केला होता.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
मागील काही दिवसांपासून हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरमध्ये नेत्रदीपक वाढ पाहायला मिळत आहे. एक महिन्यापूर्वी ज्या लोकांनी हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांना सध्या 16.74 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 164.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 117 रुपये प्रति शेअर होती तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 17.87 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hemang Resources Share Price 531178 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

#Hemang Resources Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x