19 April 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

Accenture Job Loss

Accenture Job Loss | मंदीच्या वातावरणात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चरने मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची घोषणा केली आहे. कंपनी सुमारे १९,००० नोकऱ्यांमध्ये कपात करणार आहे. नुकतेच ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने दुसऱ्या टप्प्यात 9000 लोकांची छंटणी करण्याची घोषणा केली आहे.

मोठ्या आयटी कंपन्यांनी नोकर कपात केली
पहिल्या टप्प्यात अ‍ॅमेझॉनने १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याशिवाय मेटा प्लॅटफॉर्म, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे.

भारतातील एक्सेंचरमधील कर्मचारी कपात होणार :
याबाबत तज्ज्ञांनी म्हटले आहे की, अमेरिकेत अशी नोकरकपात झालेली असताना आता भारतातील एक्सेंचरमध्ये देखील याचे परिणाम दिसतील असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण, भारतीय आयटी कंपन्यांचा महसूल मोठ्या प्रमाणात अमेरिकेतील क्लाईंटवर अवलंबून आहे. त्यामुळे लवकरच याचे परिणाम भारतातील एक्सेंचर अय आयटी कंपनीतही पाहायला मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे भारतातही उच्च-शिक्षित तरुणांना नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते असं म्हटलं जातंय.

JOb Loss 2

महसूल आणि नफा वाढीचा अंदाजही कमी
यासोबतच एक्सेंचरने आपला वार्षिक महसूल आणि नफा वाढीचा अंदाजही कमी केला आहे. कंपनीला वार्षिक महसुलात ८ ते ११ टक्क्यांच्या तुलनेत आता ८ ते १० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. या तिमाहीसाठी कंपनीचे उत्पन्न १६.१ अब्ज डॉलर ते १६.७ अब्ज डॉलरच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. अ‍ॅक्सेन्चरचा तिसऱ्या तिमाहीचा अंदाज वॉल स्ट्रीटच्या अंदाजापेक्षा कमी आहे. अ‍ॅक्सेन्चरने म्हटले आहे की प्रति शेअर कमाई 10.84 ते 11.06 डॉलर दरम्यान असेल, तर 11.20 ते 11.52 डॉलर दरम्यान असेल. त्याचवेळी प्रति शेअर १.१२ डॉलरचा लाभांशही जाहीर करण्यात आला.

Job loss

फेड रिझर्व्हचा निर्णय आणि अ‍ॅक्सेन्चरने हा निर्णय घेतला?
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची वाढ केली असताना अ‍ॅक्सेन्चरने हा निर्णय घेतला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदरात वाढ झाल्याने कंपन्यांवरील मंदीचा ताण वाढला आहे. हेच कारण आहे की कंपन्या कॉस्ट कटिंग वगैरे चे कारण देत कामावरून काढून टाकत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Accenture Job Loss around 19000 employees check details on 23 March 2023.

हॅशटॅग्स

#Accenture Job Loss(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x