20 April 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

Pidilite Industries Share Price | करोडपती स्टॉक! गुंतवणूकदारांना करोडपती बनवणार शेअर स्वस्तात मिळतोय, खरेदी करणार?

Pidilite Industries Share Price

Pidilite Industries Share Price| ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच कालपासून विक्रीच्या दबावाला तोंड देत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.59 टक्के नकारात्मक परतवा दिला आहे. असे असले तरी या स्टॉकने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ‘फेव्हिकॉल’ चे उत्पादन करणाऱ्या ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 21 टक्क्यांनी वाढू शकतो. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 2,365.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,20,193.44 कोटी रुपये आहे. (Pidilite Industries Limited)

ब्रोकरेज फर्म नोवुमा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अंदाजानुसार
ब्रोकरेज फर्म नोवुमा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अंदाजानुसार पिडिलाइट कंपनीचे मार्जिन पुढील तिमाहीत सुधारेल. ही कंपनी अशा विभागात व्यापार करत आहे, जिथे स्पर्धा फार कमी असून नवीन कंपनीला प्रवेश करणे खूप कठीण आहे, आणि व्यापारातील वाढ यात जास्त आहे, त्यामुळे एक मजबूत ब्रँड म्हणून ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स खरेदी करणे खूप फायद्याचे ठरू शकते. पिडीलाइट कंपनीचा व्यवसाय इनपुट खर्चात घट, बांधकाम क्रियाकलापांमध्ये वाढ आणि भांडवली खर्च वाढवण्याचा दबाव यामुळे आणखी सपोर्ट मिळू शकतो. बाजारपेठेतील कंपनीचे वर्चस्व, आणि 40 लाखांहून अधिक आऊटलेट्सपर्यंत पोहोच, तसेच मध्यस्थ आणि ग्राहक यांच्याशी असलेले मजबूत संबंध यामुळे नवीन कंपन्यांना या क्षेत्रात प्रवेश करणे खूप कठीण जाऊ शकते. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग दिले असून 2855 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

पिडिलाइट स्टॉकचा मल्टीबॅगर परतावा :
18 मार्च 2005 रोजी पिडीलाइट कंपनीचे शेअर्स 21.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सध्या हा स्टॉक 2,365.30 रुपयांवर पोहचला आहे. याचा अर्थ ज्या लोकांनी ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना मागील 18 वर्षांत 108 पट वाढीसह 1.08 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. महिला वर्षी 17 जून 2022 रोजी हा स्टॉक 1988.60 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तथापि अवघ्या तीन महिन्यांत म्हणजेच 15 सप्टेंबर 2022 रोजीपर्यंत शेअर 47 टक्क्यांच्या वाढीसह 2916.85 रुपयांवर पोहचला होता. मात्र या शेअर्सची तेजी इथेच थांबली आणि स्टॉक पुन्हा आपल्या उच्चांक किमतीवरुन 19 टक्क्यांनी खाली घसरला. सध्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात रिकव्हरी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pidilite Industries Share Price BSE 500331 NSE PIDILITIND on 25 March 2023.

हॅशटॅग्स

#Pidilite Industries Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x