20 April 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

ICICI Bank Share Price | 3 वर्षांत गुंतवणुकीचा पैसा तिप्पट परतावा देणारा शेअर, आता स्टॉकची नवीन टार्गेट प्राईस तपासा

ICICI Bank Share Price

ICICI Bank Share Price | ‘ICICI बँक’ या खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने सेबीला सादर केलेल्या कागदपत्रात कळवले आहे की, बँकेने 22 एप्रिल 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत, चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2022-23 साठी लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांश व्यतिरिक्त जानेवारी-मार्च तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचा स्वतंत्र आणि एकत्रित निकाल देखील तपासला जाणारा आहे. तिमाही आणि वार्षिक आर्थिक निकाल 8 मे 2023 रोजी जाहीर केला जाईल. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी ‘ICICI बँक’ स्टॉक 0.47 टक्के घसरणीसह 851.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (ICICI Bank Limited)

लाभांश वाटप :
आयसीआयसीआय बँक शेअर धारकांना नियमित लाभांश वाटप करणारी बँकिंग कंपनी नाही. पैकी या बँकेचे लाभांश उत्पन्न प्रमाणत फक्त 0.59 टक्के आहे. याचा अर्थ, जर तुम्ही या बँकिंग स्टॉकमध्ये 100 रुपये गुंतवले तर एका वर्षात तुम्हाला लाभांश म्हणून फक्त 59 पैसे मिळतील. या आर्थिक वर्षात, ‘ICICI बँक’ ने 2 रुपये दर्शनी मूल्याच्या आधारे ऑगस्ट 2022 मध्ये 250 टक्के म्हणजे 5 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप केला होता. मे 2001 मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर ‘ICICI बँक’ आपल्या शेअर धारकांना एकूण 22 वेळा लाभांश वाटप केला आहे.

शेअरची कामगिरी :
आयसीआयसीआय बँकेबाबत एक खास गोष्ट म्हणजे हा शेअर दर 3-4 वर्षांनी दुप्पट होतो. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. जर तुम्ही मागील तीन वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या बँकिंग स्टॉकने फक्त तीन वर्षात 3 पट वाढ नोंदवली आहे. 24 मार्च 2020 रोजी ICICI बँकेचे शेअर 296.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते सध्या हा स्टॉक 851.45 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशा प्रकारे, मागील तीन वर्षांत या बँकिंग शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 187.48 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

स्टॉकबाबत तज्ञ उत्साही :
मार्च महिन्यात, मॉर्गन स्टॅन्ले फर्मने आयसीआयसीआय बँकेच्या शेअरवर 1250 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली होती, आणि स्टॉकला ओव्हरवेट रेटिंग दिली होती. तर मॅक्वेरी फर्मने ‘ICICI बँक’ स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग देऊन लक्ष किंमत 1050 वरून वाढवून 1145 रुपये निश्चित केली होती. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज’ ने ‘ICICI बँक’ स्टॉकसाठी 1100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती, आणि शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर मोतीलाल ओसवाल फर्मने ‘ICICI बँक’ स्टॉकसाठी 910 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICICI Bank Share Price BSE 532174 NSE ICICIBANK on 25 March 2023.

हॅशटॅग्स

#ICICI Bank Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x