25 April 2024 11:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स कमालीचे घसरले आहेत. मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.75 टक्के घसरणीसह 51.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. मागील बऱ्याच काळापासून टीटीएमएल कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. टीटीएमएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10.333 75 कोटी रुपये आहे. 7 एप्रिल 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 210 रुपये या आपल्या 52 आठवडयांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 290 रुपये आहे. मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये टीटीएमएल कंपनीने सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. (Tata Teleservices (Maharashtra) Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
मागील तीन वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअरने सेन्सेस इंडेक्सच्या तुलनेत आपल्या गुंतवणूकदारांना 2788 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 312 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 67.74 टक्के वाढले आहेत. त्याचवेळी मागील सहा महिन्यांत टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे 49.98 टक्के नुकसान केले आहे. आज देखील हा स्टॉक 2.75 टक्के कमजोर झाला आहे.

टेलिकॉम सेक्टरमधील अनेक कंपन्याचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, तेजस नेटवर्क, रिलायन्स कम्युनिकेशन्स, हे सर्व दुरसंचार क्षेत्रातील स्टॉक कमजोर झाले आहेत. टीटीएमएल कंपनीचे डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल पाहिले तर तुम्हाला समजेल की, कंपनी ला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 279.79 कोटी रुपये तोटा नोंदवला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत टीटीएमएल कंपनीने 302.30 कोटी रुपये तोटा नोंदवला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price BSE 532371 on 28 March 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x