25 April 2024 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

निवडणुकीदरम्यान बातम्या निर्मितीसाठी पत्रकार अक्षय कुमार यांचे फिल्मी प्रश्न

Narendra Modi, Loksabha Election 2019, Akshay Kumar

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींची ही मुलाखत बॉलिवूडचा कलाकार अक्षय कुमार याने घेतली आहे. या मुलाखतीतून मोदींनी आयुष्यातले अनेक पैलू उलगडले असं म्हटलं आहे. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्याच देखील म्हटलं आहे. दरम्यान, या मुलाखतीमध्ये मोदींनी आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे एक गुपित सांगितले आहे.

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’ असा प्रश्न अक्षयने पंतप्रधान मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी अशाप्रकारे घड्याळ घालण्यामागचं एक विशेष कारण असल्याचे सांगितलं आहे. ‘मी अनेकदा मीटिंगमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिलं तर माझ्या या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घालतो कारण वेळ पाहायचा झाल्यास समोरच्या लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहता येतो,’ असं स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

वास्तविक अक्षय कुमार हा २००८ पासूनच राजकीय दृष्ट्या मोदींच्या संपर्कात असलेला अभिनेता. त्याचे मोदींसोबतचे २००८ पासूनचे जुने व्हिडिओ आज देखील आजही सहज उपलब्ध आहेत. करोडपती असून देखील २०१४ पूर्वी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीने त्रस्त होऊन त्याने काँग्रेस पक्षावर टीका करण्यासाठी ट्विट केले होते आणि मोदी सत्तेत येताच पेट्रोलचे भाव गगनाला भिडताच त्याने ट्विट डिलीट केले होते, इतकं त्याच सामान्य जनता आणि मोदींशी नितळ नातं आहे. त्याच्यातील देशभक्ती एकदम २०१४ नंतर उफाळून आली जी कारगिल युद्घानंतर देखील पाहायला मिळावी नाही. फॅशनशोमध्ये सार्वजनिकरित्या बायकोच्या हाताने स्वतःच्या जीन्सची चैन खोलायला लावणे आणि सिनेमात भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याची भूमिका बजावताना खरा ड्रेसकोड वापरून नंतर तो विकण्यासाठी ऑक्शन करणे अशी मोठी दिव्य कामगिरी देखील त्याने बजावली आहे. त्या ऑक्शनमुळे नाराज झालेल्या माजी नौदल सैनिकांच्या संस्थांनी त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर खटले दाखल केले आहेत. कॅनडियन नागरिकत्वाच्या नावाने सरकारकडून मोठा टॅक्स वाचवून त्यातील काही भाग दान करून त्याने स्वतःच मोठं मार्केटिंग देखील केलं आणि मोदी बाजूला असतील याची पुरेपूर काळजी घेतली.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याचं मोदीप्रेम पुन्हा उफाळून आलं आहे. त्यासाठीच त्याने स्वतःला सतावणारे भव्य-दिव्य प्रश्न मोदींना विचारले आणि बातम्या वर बातम्या कशा निर्माण होतील याची ठरून योग्य काळजी घेतली. त्यातीलच त्याला पडलेला मोठा प्रश्न म्हणजे मोदी हातातील घडयाळ उलटं का घालतात आणि मोदी त्याला दिलेले दर्जेदार उत्तर म्हणजे “मी उलट्या पद्धतीने घड्याळ घालतो कारण वेळ पाहायचा झाल्यास समोरच्या लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहता येतो”. आता मोदींना हे कोणी सांगितलं की घड्याळ सरळ घातलं की हळूच पाहता येत नाही ते देव जाणो. कारण मोदी हे कधीतरी तशाप्रकारे घड्याळ घालतात किंवा मुलाखतीसाठी ते घातलं असावं, जेणेकरून अक्षय कुमार असे भव्य-दिव्य प्रश्न विचारू शकतो आणि ब्रेकिंग न्यूज बनवणं शक्य होईल. वास्तविक गुगलवर त्यांचे सर्वाधिक फोटो हे सरळ घड्याळ घालूनच दिसतील. तसेच देशाच्या राजकारणात अनेक मोठे नेते हातातील घड्याळ उलटं घालतात ज्यामध्ये स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. मात्र असा भव्य-दिव्या प्रश्न आज पर्यंत त्यांना कोणत्याही पत्रकाराने विचारला नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x