24 April 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

IBM Hiring AI for Job | हा वाट्टोळं करणार! ना पगार घेणार, ना सुट्टी!, IBM कंपनीत 7800 जागांसाठी AI ची भरती

IBM Hiring AI for Job vacancy

IBM Hiring AI for Job | एक कंपनी आता नोकरभरती करण्याऐवजी एआय नोकऱ्या विकसित करणार आहे आणि मोठ्या संख्येने नोकऱ्यांची जागा एआयने घेण्याची योजना आखली आहे. लवकरच ७,८०० नोकऱ्यांची जागा एआय घेऊ शकते. ही कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांनी सांगितले की, कंपनी येत्या काही वर्षांत नोकरभरती थांबवून त्याजागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणण्याची योजना आखली आहे. कृष्णा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, बॅक ऑफिसच्या कामातील भरती कमी करण्यात आली आहे. तसेच काही विभागातील नोकरभरती बंद करण्यात आली आहे.

पुढील पाच वर्षांत ७,८०० नोकऱ्या बदलणार
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या सीईओंनी सांगितले की, या नॉन-कस्टमर फेसिंग भूमिका सुमारे 26,000 कामगारांवर अवलंबून आहेत. ‘आम्ही आगामी पाच वर्षांच्या कालावधीत एआय आणि ऑटोमेशनमधून ३० टक्के काम करण्याचे लक्ष ठेवत आहोत. अशा परिस्थितीत सुमारे कंपनीतील ७,८०० नोकऱ्या जाण्याचा अंदाज आहे. आयबीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोणत्याही कपातीऐवजी एआय वापरण्याची योजना अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही.

हे काम एआयद्वारे करणार
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, रोजगार पडताळणी पत्र देणे किंवा कर्मचाऱ्यांची बदली करणे पूर्णपणे हे ऑटोमेशन आधारित असेल. ते म्हणाले की, मनुष्यबळाची रचना आणि प्रॉडक्टिविटीचे मूल्यमापन इत्यादी काही मनुष्यबळाची कामे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केली जातील.

आयबीएम किती लोकांना रोजगार देते?
आयबीएममध्ये सध्या सुमारे 260,000 कर्मचारी कार्यरत आहेत आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी नियुक्त केले जातात. कृष्णा म्हणाले की, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आज टॅलेंट शोधणे सोपे आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती. सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IBM Hiring AI for Job vacancy of 7800 seats check details on 02 May 2023.

हॅशटॅग्स

#IBM Hiring AI for Job(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x