23 April 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Mirza International Share Price | या शेअरने एका महिन्यात 56% परतावा दिला, 65 रुपयांचा शेअर आत्ताच खरेदी करणार का?

Mirza International Share Price

Mirza International Share Price| ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या तयार लेदर आणि फुटवेअर बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. मागील एका महिन्यात ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरने लोकांना बंपर परतावा दिला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 56.25 टक्के नफा कमावला आहे. मिर्झा इंटरनॅशन कंपनीचे शेअर्स (Mirza International Share Price NSE) एका महिन्यात 35.37 रुपयांवरून वाढून 61.98 रुपयेवर पोहचले आहेत. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 65.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिर्झा इंटरनॅशनल कंपनीने आपला प्रमुख ब्रँड ‘RepTape’ बबंद करून वेगळ्या कंपनीत बदलला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने मंजूर केलेल्या डिमर्जर करारानुसार, मिर्झा इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरधारकांना प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याचे रेडटेप कंपनीचा 1 पूर्ण पेड अप इक्विटी शेअर वाटप करण्यात आला आहे. रेडटेप ही कंपनी लवकरच स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या माहितीनुसार, कंपनीचे एकूण बाजार भांडवल 301 कोटी रुपये आहे.

लेदर फुटवेअर पुरवठादार आणि उत्पादक कंपनी ‘मिर्झा इंटरनॅशनल लिमिटेड’ ला ‘RTS फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रमोटर ग्रुपच्या मालकीच्या कंपनीच्या विलीनीकरणासाठी NCLT कडून मान्यता देण्यात आली आहे. ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनी रेडटेप ब्रँड अंतर्गत ब्रँडेड उत्पादने डिझाइन, मार्केटिंग आणि वितरणाचे काम करते. त्याच वेळी, RTS Fashions ही कंपनी चामड्याचे वस्तू आणि उत्पादन UK, USA आणि इतर देशांमध्ये निर्यात आणि विक्रीचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mirza International Share Price today on 18 May 2023

हॅशटॅग्स

Mirza International Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x