25 April 2024 6:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Dixon Technologies Share Price | डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरवर नवीन टार्गेट प्राईस जाहीर, स्टॉक खरेदी वाढली, डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • Dixon Technologies Share Price
  • शेअरची टार्गेट प्राईस
  • कंपनीच्या ग्राहक वर्गात वाढ होण्याची अपेक्षा
  • डिक्सन टेक्नॉलॉजी’ कंपनी – निव्वळ नफा
Dixon Technologies Share Price

Dixon Technologies Share Price | ‘डिक्सन टेक्नॉलॉजी’ या इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी अप्रतिम तेजी पाहायला मिळाली. या कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 3580 रुपये किमतीवर पोहोचले होते. शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यक्त करत आहेत. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 3,587.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची टार्गेट प्राईस :
JM Financial फर्मने ‘डिक्सन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्सवर 4000 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने या कंपनीच्या शेअरवर 3865 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर MK Global फर्मने शेअरवर 3,403 रुपये लक्ष किंमत निश्चित केली होती, जी कंपनीने स्पर्श केली आहे.

कंपनीच्या ग्राहक वर्गात वाढ होण्याची अपेक्षा
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या शेअरवर 3000 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीने दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, मोबाईल आणि होम अप्लायन्सेस विभागात कंपनीच्या ग्राहक वर्गात वाढ होण्याची अपेक्षा आहे. मोबाईल सेगमेंटमध्ये नवीन ग्राहक जोडण्याचा कंपनीला चांगला फायदा होईल, मात्र काही मोठ्या सेगमेंटमध्ये समस्या येऊ शकतात.

डिक्सन कंपनीला B2B पुरवठादार असण्याचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो असे तज्ञ म्हणतात. एमके ग्लोबलचे तज्ञ म्हणाले की मार्च 2023 तिमाहीत कंपनीची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता आहे.

डिक्सन टेक्नॉलॉजी’ कंपनी – निव्वळ नफा
मार्च 2023 तिमाहीत ‘डिक्सन टेक्नॉलॉजी’ कंपोने 80.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 63.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो या तिमाहीत 27.7 टक्के वाढला आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत ‘डिक्सन टेक्नॉलॉजी’ कंपनीने 3,065.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 2,953 कोटी रुपये होता. ‘डिक्सन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी 3 रुपये अंतिम लाभाश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dixon Technologies Share Price today on 25 May 2023.

हॅशटॅग्स

Dixon Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x