29 March 2024 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Poonawalla Fincorp Share Price | मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्के परतावा देणारा शेअर, आजही होतेय जोरदार खरेदी

Highlights:

  • Poonawalla Fincorp Share Price
  • शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी
  • 1 लाख रुपयेवर 26 लाख परतवा
  • पूनावाला फिनकॉर्प वरचढ
Poonawalla Fincorp Share Price

Poonawalla Fincorp Share Price | ‘पूनावाला फिनकॉर्प’ या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरभरून परतावा दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 13 रुपयांवरून वाढून 350 रुपये किमतीवर पोहचले आहेत. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 351.10 रुपये होती. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 209.15 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के घसरणीसह 345.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 लाख रुपयेवर 26 लाख परतवा :
पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 29 मे 2020 रोजी 13.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 347.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्समध्ये 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 26.02 लाख रुपये झाले असते.

पूनावाला फिनकॉर्प वरचढ :
मार्केट कॅपच्या बाबतीत पूनावाला फिनकॉर्प कंपनीने फेडरल बँकला मागे टाकले आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे बाजार भांडवल 26690 कोटी रुपये आहे. तर फेडरल बँकेचे बाजार भांडवल 26061 कोटी रुपये आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 577.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी, मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 180.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 62.14 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Poonawalla Fincorp Share Price today on 26 May 2023.

हॅशटॅग्स

#Poonawalla Fincorp Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x