29 March 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

लोकसभा मतमोजणीच्या दिवशी मोबाईल टॉवर बंद करा अन्यथा जॅमर बसवा; मनसेची मागणी

MNS, Raj Thackeray, Loksabha Election 2019

ठाणे: व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. याची विरोधी पक्षांकडून प्रचंड नाराजी वर्तवली जात आहे. दरम्यान लोकसभा मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने देखील सरसावली आहे. लोकसभा मत मोजणीच्या दिवशी ठाण्यातील मोबाईल टॉवर बंद ठेवावेत अन्यथा मतमोजणी केंद्रामध्ये जॅमर बसवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे केली आहे.

तसेच मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधींना सक्तीची मोबाईल बंदी करण्यात यावी, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी दूरध्वनी किंवा वॉकीटॉकी सेवा वापरण्यात यावी अशी मागणी देखील अविनाश जाधव यांनी केली आहे. व्हीव्हीपॅट मशीन लावले गेले आणि त्यावर चित्र देखील दाखवले गेले. पण या ईव्हीएम मशिनमधील चिठठ्याच मोजायच्या नसतील तर त्या मशिनचा उपयोग काय? असा सवाल जाधव यांनी केला. तसेच हे नाटक न समजण्याइतकी जनता अडाणी नसल्याचेही ते पुढे म्हणाले.

ईव्हीएम संदर्भात असलेल्या कोणत्याही तक्रारींचे नागरिकांना समाधान होईल असे उत्तर निवडणूक आयोगाने दिलेले नाही. याबाबत आम्ही अनेक पत्र महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिलेली आहेत. पण त्याचे साधी पोच देण्याचे सौजन्य निवडणूक आयोगाने दाखवलेले नाही. याचाच अर्थ निवडणूक आयोग किती निर्ढावलेले आहे हे स्पष्ट असल्याची टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x