'मोदी देशात दुफळी निर्माण करणारे नेते' या बातमीवर रावसाहेबांनी ट्विट केलं 'पूर्ण जगात मोदी साहेबांचा डंका'
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. परंतु यावेळी नरेंद्र मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने थेट दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी प्रसिद्ध केला होता.
‘लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल’ या वाक्याने लेखाची सुरुवात झाली आहे. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला अजून ५ वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली आहे. या लेखामध्ये तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘लोकप्रियतेमुळे या आधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बहुसंख्याकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम झाले आहे. परंतु त्याच वेळी यामुळे देशातील वातावरण निकोप व उत्साहवर्धक राहिलेले नाही,’ असं देखील तासीर यांनी या लेखात म्हटले होते.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी उत्साहाच्या भरात आणि त्या बातमीचा अर्थ न वाचताच नरेंद्र मोदींनाच मेन्शन करत ट्विट केलं ‘पूर्ण जगात मोदी साहेबांचा डंका’. त्यानंतर त्यांची समाज माध्यमांवर चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांनी लगेचच ते ट्विट डिलीट मारले आहे. परंतु तो पर्यंत त्याचे स्क्रिनशॉट मात्र नेटकऱ्यांच्या हाती लागले आणि त्यांची पोलखोल पुढे देखील सुरु राहिली.
दानवेंनी डिलीट केलेलं ट्विट काय होतं?
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल