23 April 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा
x

चंद्राबाबू-शरद पवार भेट! दीड तास चर्चा

Loksabha Election 2019, Chandrababu Naidu, NCP, TDP, Sharad Pawar

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी’चे सर्वेसेवा चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

त्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंच परंतु त्यानंतर चंद्राबाबूंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांची देखील भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली असून तब्बल दीड तास त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू लखनऊत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे.

तसेच टीडीपी प्रमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सुधाकर रेड्डी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांचीही चंद्रबाबू नायडू भेट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या वेगवान हालचालींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x