19 April 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

VIDEO : 'एक्झिट पोल' आणि ईव्हीएम'वरून थेट शस्त्र आणि रक्तपाताची भाषा

BJP, Exit Poll, Narendra Modi, Congress, RLDS, Rahul Gandhi, Loksabha Election 2019

पाटणा : मागील रविवारी संपलेल्या मतदानानंतर ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले आणि देशभरातील विरोधकांनी निरनिराळी विधानं करण्यास सुरुवात केली आहे. जाहीर झालेल्या सर्वच पोल्समध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात यावेळी देशभरातील वृत्त वाहिन्यांनी केला आहे. यामुळे सत्तेत येण्याची आस लावून बसलेल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झालाय. त्यामुळे बिथरलेल्या बिहारच्या नेत्याने चक्क शस्त्रच हातात घेण्याचं आवाहन केलं.

‘एक्झिट पोल’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भुमिका स्पष्टकरण्यासाठी पाटण्यात आज पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी सर्व एक्झिट पोल हे खोटे असल्याचं सांगितलं. पहिले बुथ लुटण्यात आले, आता निकालांची लूट करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. अशा वेळी गरज पडली तर महाआघाडीच्या नेत्यांनी शस्त्र हातात घेण्यास मागेपुढे पाहु नये असं आवाहनही त्यांनी केलं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x