29 March 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

सुरतमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सला आग लागून २० जणांचा मृत्यू

Narendra Modi, Amit Shah

गुजरातमधल्या सुरतच्या तक्षशिला इमारतीला आग लागून आत्तापर्यंत एकूण वीस निरपराधांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तब्बल दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे असेही समजते आहे. दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या इमारतीला या इमारतीला लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. काहीजण या इमारतीत अडकलेही आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली त्यामुळे विद्यार्थ्यांनी अडकलेल्या लोकांनी उड्या टाकल्या. तसेच इतर काही लोकांनीही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या टाकल्या.

मृतांच्या कुटुंबीयांना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच संबंधित घटना का घडली? इमारतीत आग नियंत्रण करणारी यंत्रणा नव्हती का? याबाबत सविस्तर चौकशीचेही आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच रूग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x