29 March 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम! थोड्याच वेळात बैठक

Rahul Gandhi, Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील देशभरात झालेल्या दारूण पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला वारंवार राहुल गांधी राजीनामा देणार नाहीत असे सांगत आहेत. दरम्यान, आज सायंकाळी ४:३० वाजता राहुल गांधींनी आपल्या घरी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीस युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह कॉंग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मात्र कॉंग्रेस सदस्यांनी तो स्वीकारला नाही. तेव्हापासून राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असून आज साडेचार वाजता अंतिम बैठक पार पडणार आहे.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x