29 March 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

दूध महागलं! निवडणुकीत 'चाय पे चर्चा' संपताच सरकारने प्रति लिटर 3 रू अनुदान बंद केले

Devendra Fadanvis, Narendra Modi

मुंबई : लोकसभा निवडणूक संपताच आणि केंद्रात बहुमताने मोदी सरकार पुन्हा विराजमान होताच, महागाईत आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. खाजगी आणि सहकारी दूध महासंघाची महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या दरात २ रूपयांची वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाचे नवे दर ८ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. सध्या गायीच्या दुधाचा दर ४२ रूपये प्रति लिटर असून तो आता ४४ रूपये प्रति लिटर होणार आहे.

आम्ही २५ रूपये प्रति लिटर दराने दूध विकत घेतो. सरकारने यावर प्रति लिटर मिळणारे ३ रूपयाचे अनुदान देखील एप्रिल महिन्यापासून बंद केले आहे. त्यामुळे आमच्यावर याचा अतिरिक्त भार पडत असून मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढवण्यावर विचार करावा लागत असल्याचे महाराष्ट्र दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया संघटनेचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी दिली होती.

गेल्या अनेक दिवसांमुळे सरकारकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने दुध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर २३ ते २५ रुपयाचा भाव देण्यात येत होता. परंतु संघटनेने प्रति लिटर ३० रूपयांचा दर देण्याची मागणी केली होती. एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत झालेली लक्षणीय वाढ यामुळे हजारो शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे कमीतकमी पुढील ३ महिन्यांसाठी सरकारने ५ रूपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी केली असल्याचेही संघटनेचे उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी सांगितले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत गायीच्या दुधाचे दर २ रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत केवळ लोकांनां स्वतःकडे आकर्षित करून मार्केटिंग करण्यासाठी चाय पे चर्चा करणारे मोदी याविषयात काही बोलतील अशी अपेक्षा नाही. त्यामुळे निवडणूक संपताच चाय देखील संपल्याची चर्चा रंगली आहे. मात्र त्या चाय’साठी लागणाऱ्या दुधाच्या भावाकडे सरकारचे किती लक्ष आहे याचा प्रत्यय येतो आणि याचा थेट फटका सामान्य लोकांना बसणार असल्याने सरकार नमती भूमिका घेईल अशी देखील शक्यता दिसत नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x