25 April 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या
x

पद्मावती सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होण्याची शक्यता, नावात ही बदल ?

३० डिसेंबर : सुरवातीपासूनच राजकीय वादात अडकलेल्या पद्मावती सिनेमाचे शुक्लकाष्ट अजूनही कमी होताना दिसत नाही. अगदी सेन्सॉर बोर्डाने ही पासिंग सर्टिफिकेट नाकारल्याचे समजतंय. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होणार की नाही हे अजून जुलदस्त्यातच आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने ही काही बदलांसह पद्मावती सिनेमाला मंजुरी देण्याचे मान्य केले आहे. या सिनेमाच्या मूळ नावात थोडे बदल करून ते ‘पद्मावत’ असे करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हा सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून रिलीज होण्यापूर्वीच अनेक राज्यांमध्ये सिनेमावर बंदी घालण्यात होती. हा सिनेमा रजपूत राणी पद्मावतीच्या जोहाराच्या कथेवर ‘पद्मावती’ हा सिनेमा आधारित आहे. चित्रपटाची मूळ कथा ही ‘पद्मावत’ या काव्यातून घेण्यात आली आहे आणि हाच धागा पकडून सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावत’ हे नाव सूचित केल्याचे बोलले जात आहे.

हा सिनेमात राजपुतांना आणि राणी पद्मावतील चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असल्याचे सांगत पद्मावती राणीच्या वंशजांनी देखील या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. सर्वात जास्त विरोध राजस्थानात करणी सेनेने केला होता आणि त्या विरोधात आंदोलन ही केलं होत. गुजरात निवडणुकीचे पदधाम वाजत असल्याने कोणता ही वाद नको म्हणून पहिल्यांदा भाजप शासित गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्या राज्य सरकारने आधीच बंदी घातली होती.

आता प्रेक्षकांना एकच उत्सुकता लागून राहिली आहे आणि ती म्हणजे ‘पद्मावती’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला थिएटर मध्ये कधी झळकणार त्याची.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x