18 April 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी फडणवीसांकडून फोन: अशोक चव्हाण

BJP, bjp maharashtra, congress, congress maharashtra, devendra fadnavis, ashok chavhan

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याच्या ऑफर्स देत आहेत असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सतत आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यासोबतच भाजप मधले काही नेते देखील काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवर असून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष प्रवेश काही दिवसांसाठी लांबवला आहे. त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील ह्यांनी काँग्रेस सोडून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार देखील झाले. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या सोबत काँग्रेसचे काही आमदार घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात चालणारा घोडेबाजार हा काही आपल्यासाठी नवा नाही. निवडणुका आल्या कि राजकारण्यांच्या माकडउड्या सुरु होतात. प्रत्येक राजकीय पक्षाला काही नैतिक मूल्यांचा आधार असतो परंतु पक्ष परिवर्तन केल्यानंतर आपण ज्या राजकीय पक्षांच्या मूल्यांवर टीका केली होती ते साफ विसरून नवीन नैतिक मूल्ये ते आत्मसाद करतात.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x