28 March 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

तर सर्वच पक्षांना धडकी भरेल..प्रकाश आंबेडकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार

Raj Thackeray, Prakash Ambedkar, Raju Shetty

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी राजकीय उलथापालट होण्याची शक्यता आहे. दरम्यान जर अशी युती सत्यात उतरल्यास प्रचंड वलय असलेले दोन नेते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राज्यातील समीकरणं बदलतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व पक्षांसोबत राहावे अशी इच्छा असून आपण त्यासाठी प्रयत्न देखील करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी यावेळी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नुकतीच राष्ट्रवादीचे मावळचे विजयी खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. लोकसभेत झालेल्या चुका टाळून विधानसभेसाठी तयार होण्याकडे आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत.राजू शेट्टी यांनी यावेळी आपल्या लोकसभेतील पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. “लोकसभेत शेतकऱ्यांनी मते दिली पण ती यंत्रातून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर आमचा विश्वास नाही”, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतविभाजनाचा मोठा फटका बसला. त्यामुळे लोकसभेत झालेली ही चूक विधानसभेत टाळण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चितच करण्यात येतील.

दरम्यान, मनसे आणि वंचित आघाडी एकत्र आल्यास राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जर या आघाडीची शक्यता प्रत्यक्षात नावारूपाला आल्यास सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे कट्टर मराठी समर्थक असले तरी त्यांचा पक्ष आणि ते स्वतः जात या विषयाला विषयाला मानत नाहीत, तर प्रकाश आंबेडकर यांना मानणाऱ्या बहुजन समाजाला देखील राज ठाकरेंबद्दल मोठं आकर्षण आहे. दोन्ही आक्रमक नेते एकत्र आल्यास सत्ताधारी मात्र मोठ्या पेच प्रसंगात अडकतील अशी शक्यता आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x